Ad Advertisement Ad Advertisement

High Voltage Electricity – इलेक्ट्रिक आर्क, इलेक्ट्रिक फील्डपासून 99 टक्के लोक धोक्यापासून अनभिज्ञ

हाय व्होल्टेज वीज वाहक तारांच्या खाली जाणे ठरू शकते जीवघेणे

नवी दिल्ली : High Voltage Electricity शहरे आणि गावांमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी मोठ्या हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन्सचा वापर केला जातो. काही मोठ्या वीजवाहिन्यांमध्ये तब्बल ७,६५,००० (७.६५ लाख) व्होल्टपर्यंतचा विद्युत प्रवाह असतो. अनेकदा लोक या तारांच्या खाली किंवा आसपास फिरणे हलक्यात घेतात, परंतु या शक्तिशाली तारांच्या अतिशय जवळ जाणे किंवा त्यांच्या खाली विनाकारण थांबणे अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक ठरू शकते.

तारांना स्पर्श न करता बसू शकतो तीव्र झटका (इलेक्ट्रिक आर्क)

बऱ्याच लोकांना असे वाटते की विजेचा झटका केवळ तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या उघड्या तारांना स्पर्श केल्यावरच बसतो. मात्र, हाय व्होल्टेज तारांच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही. या तारांमध्ये एवढा प्रचंड वीजप्रवाह असतो की, जर एखादी व्यक्ती किंवा वस्तू त्यांच्या खूप जवळ गेली, तर वीज थेट हवेच्या माध्यमातून (विना स्पर्श करता) माणसाच्या शरीरात प्रवेश करू शकते. या प्रक्रियेला इलेक्ट्रिक आर्क म्हणतात आणि याद्वारे जीव जाण्याचा मोठा धोका असतो.

सोशल मीडियावरील ट्यूब लाईटच्या व्हिडिओचे वास्तव

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यामध्ये लोक हाय व्होल्टेज तारांच्या खाली हातात ट्यूब लाईट धरून उभे राहतात आणि ती ट्यूब लाईट कोणत्याही वायर जोडणीशिवाय आपोआप अंधुकशी प्रकाशू लागते. विज्ञान सांगते की, या तारांच्या सभोवताली एक अतिशय शक्तिशाली इलेक्ट्रिक फील्ड (विद्युत क्षेत्र) तयार झालेले असते. हे क्षेत्र हवेतील घटकांद्वारे ट्यूब लाईटमधील गॅसला (वायूला) उत्तेजित करते आणि ती पेटते. याचा अर्थ असा मुळीच नाही की ज्याप्रमाणे ट्यूब लाईटमधून वीज वाहत आहे, त्याचप्रमाणे ती माणसाच्या शरीरातूनही सुरक्षितपणे जाईल. माणसाच्या शरीरातून असा विद्युतप्रवाह जाणे अत्यंत घातक ठरू शकते.

सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यावी?

हाय व्होल्टेज ट्रान्समिशन टॉवर्स आणि त्यांच्या तारांपासून नेहमी एक सुरक्षित आणि ठराविक अंतर राखणे आवश्यक आहे. अशा परिसरात लोखंडी सळ्या, लांब बांबू किंवा पतंग उडवणे पूर्णपणे टाळले पाहिजे, कारण यामुळे इलेक्ट्रिक आर्क तयार होण्याचा धोका दुपटीने वाढतो.

Read About : Mahavitaran Fake Recruitment : 23 हजार जागांची जाहिरात खोटी; महावितरणचा खुलासा
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.