नवे संशोधन : जेवणानंतर सप्लिमेंट घेणे लाभदायक
ओटावा : Vitamin C and Cancer Risk – व्हिटॅमिन सी हे आरोग्यासाठी महत्त्वाचे जीवनसत्त्व मानले जाते. कॅनडातील वॉटरलू वद्यिापीठाच्या संशोधकांनी केलेल्या नव्या अभ्यासानुसार, व्हिटॅमिन सी पोटात कर्करोगाशी संबंधित काही रसायने तयार होण्याची प्रक्रिया कमी करू शकते. मात्र हा नष्किर्ष सध्या गणिती मॉडेलवर आधारित आहे. त्यामुळे याला कर्करोग रोखण्याचा नश्चिति उपाय समजू नये. हा अभ्यास जर्नल ऑफ थिअरेटिकल बायोलॉजीमध्ये प्रसद्धि झाला आहे.
नायट्रेट आणि नायट्राइट ही रासायनिक संयुगे बेकन, सलामी यांसारख्या प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये आढळतात. प्रदूषित माती किंवा पाण्यात वाढलेल्या भाज्या व फळांमधूनही ती शरीरात जाऊ शकतात. या संयुगांची शरीरात काही उपयुक्त कामे असली, तरी पोटात त्यांच्यापासून काही घातक पदार्थ तयार होऊ शकतात. या प्रक्रियेला नायट्रोसेशन असे म्हणतात. त्यात तयार होणाऱ्या काही रसायनांचा कर्करोगाच्या जोखमीशी संबंध असू शकतो, असा संशोधकांचा अंदाज आहे. मात्र नायट्रेट असलेले प्रत्येक अन्न धोकादायकच असते, असे म्हणता येत नाही.
असा केला अभ्यास
संशोधकांनी मानवी शरीरातील प्रक्रिया लक्षात घेऊन एक गणिती मॉडेल तयार केले. त्यात लाळग्रंथी, पोट, लहान आतडे आणि रक्तातील द्रव यांचा समावेश आहे. नायट्रेट आणि नायट्राइट शरीरात गेल्यानंतर त्यांच्यात कोणते बदल होतात आणि व्हिटॅमिन सी त्यावर कसा परिणाम करते, याचा अभ्यास करण्यात आला. मॉडेलनुसार, नायट्रेट किंवा नायट्राइटयुक्त पदार्थांसोबत व्हिटॅमिन सी घेतल्यास घातक रसायने तयार होण्याची प्रक्रिया काही प्रमाणात कमी होऊ शकते. पालकासारख्या पालेभाज्यांमध्ये नायट्रेटसोबत व्हिटॅमिन सीही असते. त्यामुळे या भाज्यांमधील व्हिटॅमिन सी नायट्रोसेशन कमी करण्यास मदत करू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
प्रतिबंधात्मक उपाय समजू नका
जेवणानंतर व्हिटॅमिन सीचे सप्लीमेंट घेतल्यास काय होऊ शकते, याचाही अंदाज संशोधकांनी घेतला. त्यानुसार नायट्रोसेशनशी संबंधित रसायनांची नर्मितिी मध्यम प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र यामुळे प्रत्यक्ष माणसांमध्ये कर्करोगाचा धोका कमी होतो का, हे अद्याप तपासलेले नाही. पुढील टप्प्यात प्रयोगशाळा चाचण्या आणि मानवी वैद्यकीय अभ्यास आवश्यक आहेत. त्यामुळे सध्या तरी व्हिटॅमिन सीच्या गोळ्यांना कर्करोगावरील प्रतिबंधक उपाय समजणे योग्य ठरणार नाही.
Read About : Potassium-Enriched Salt Benefits : पोटॅशियमयुक्त मिठाच्या वापराने देशात टळू शकतात वर्षभरात 4 लाख मृत्यू E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.