टँकरची मागणी दुप्पट; ११ जिल्ह्यांतील ३८०१ वाड्यांना १३२३ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुंबई : 19 dams dry मराठवाड्यातील तब्बल १९ धरणे पूर्णपणे कोरडीठाक पडल्याने आणि स्थानिक जलस्रोत आटल्याने गेल्या महिन्याभरात टँकरची मागणी दुप्पट झाली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट गडद झाले असून, सध्या ११ जिल्ह्यांतील ११०२ गावे आणि ३८०१ वाड्यांना १३२३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यापैकी सर्वाधिक ६६८ टँकर एकट्या मराठवाड्यात असून, त्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३२६ टँकर कार्यरत आहेत. धरणे अधिक असलेल्या नाशिक जिल्ह्यातही ४३ टँकर लावावे लागले आहेत. टँकरची मागणी आणखी वाढण्याचा इशारा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
दुष्काळी स्थिती लक्षात घेता राज्य सरकारने ३१० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, आणखी १३ तालुक्यांचा समावेश करण्याच्या मागणीवरून तेथे सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेतून टंचाईग्रस्त भागातील तातडीने गरजेची नसलेली व जास्त पाणी लागणारी नवीन बांधकामे तात्पुरती स्थगित करून सर्व निधी पिण्याच्या पाण्यासाठी वळवण्याचे निर्देश दिले आहेत.
धाराशिव, बीडमध्ये टंचाई
जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातील धरणांमध्ये सध्या ६१.८८ टक्के साठा आहे, जो गेल्या वर्षी ९०.२६ टक्के होता. विभागीय साठ्यामध्ये कोकण ७९ टक्के, पुणे ७२.४४ टक्के, नाशिक ७१.३० टक्के, नागपूर ५४.९३ टक्के, अमरावती ५०.५३ टक्के आणि मराठवाडा ३३.७९ टक्के आहे. धाराशिवमध्ये केवळ निम्न तेरणात १४ टक्के, तर बीडमध्ये माजलगाव व धनेगाव धरणात १४ ते १६ टक्के पाणी शिल्लक असून, इतर सर्व धरणे कोरडी पडल्याने शेजारील जिल्ह्यांतून टँकर आणावे लागत आहेत.
Read About : Gokul milk price hike in Kolhapur – गोकुळच्या म्हशीच्या दुधात सहा, तर गाईच्या दुधात चार रुपयांची वाढ!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.