Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra Exam Fee Waiver 15 Lakh Students – दुष्काळग्रस्त 15.28 लाख विद्यार्थ्यांना 96.27 कोटींची परीक्षा शुल्कमाफी

दहावी आणि बारावीच्या परीक्षा पारदर्शक, गैरप्रकारमुक्त घेण्याचे मंत्री भुसे यांचे कठोर निर्देश

मुंबई : Maharashtra Exam Fee Waiver राज्यातील दुष्काळग्रस्त घोषित ३१० तालुक्यांतील दहावी आणि बारावीच्या १५ लाख २८ हजार ६२७ विद्यार्थ्यांना अंदाजे ९६ कोटी २७ लाख रुपयांची परीक्षा शुल्कमाफी देण्यात येणार आहे. यामध्ये दहावीच्या ८ लाख ५२ हजार ४९६ व बारावीच्या ६ लाख ७६ हजार १३१ विद्यार्थ्यांचा समावेश असून, शुल्क भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांना परतावा देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करून दहावी आणि बारावीच्या परीक्षा पारदर्शक, सुरक्षित व गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्याचे निर्देश दिले.

मंत्रालयात बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस शालेय विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सच्चद्रिं प्रताप सिंह, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी आणि सचिव डॉ. दीपक माळी उपस्थित होते. बारावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी, तर दहावीच्या २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान होतील. दोन्ही निकाल एप्रिल २०२७ अखेर लागण्याचे नियोजन असून, नियमित अर्जाची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२६ आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ दरम्यान होणार आहे.

कडक सुरक्षा, ड्रोन आणि समुपदेशनाची सोय

बारावीची ३ हजार ३३२ व दहावीची ४ हजार ९९७ परीक्षा केंद्रे निश्चित झाली असून, सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही राहतील. बारावीसाठी ५०६ व दहावीसाठी ५२५ परिरक्षक केंद्रांना २४ तास पोलीस संरक्षण दिले जाईल. जानेवारी २०२७ मध्ये जनजागृती सप्ताह, भरारी पथके, संवेदनशील केंद्रांवर ड्रोन निगराणी व केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद राहतील. निवडक विषयांच्या उत्तरपत्रिकांचे कृत्रिम बुद्धिमत्तेने मूल्यमापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तणावमुक्तीसाठी ३१० समुपदेशकांसह टेली मानस (१४४१६) व मनोदर्पण (८४४८४४०६३२) हेल्पलाइन उपलब्ध असतील, अशी माहितीही देण्यात आली आहे.

Read About : Maharashtra CET 2027 Exam Schedule – पुढील वर्षी 21 सीईटी परीक्षा; 11 अभ्यासक्रमांसाठी दोनदा संधी

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.