रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन | डॉ. तसनीम पटेल लिखित ‘टॉर्चर्ड ट्रूथ’ चे थाटात प्रकाशन
छत्रपती संभाजीनगर : Tortured Truth Book – अगणित हाल अपेष्ठा सहन करीत आणि परिस्थितीवर मात करीत माणुसकी टिकवून ठेवण्याची जिद्द, प्रेरणा आणि उत्कट शिकवण ‘टॉर्चर्ड ट्रूथ’ मधून मिळते. अर्थातच ही शिकवण इतरांचे दु:ख कमी करण्यासाठीची धडपड असून, ती पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित होण्याची आज सर्वाधिक गरज आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी प्रा. डॉ. तसनीम पटेल लिखित पुस्तकाबाबत गौरवोद्गार काढले.
आयुष्यातील संघर्ष, जिद्द, चिकाटी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मिळवलेल्या यशाचा प्रवास मांडणाऱ्या डॉ. तसनीम पटेल लिखित ‘भाळ आभाळ’ या मराठी पुस्तकाच्या ‘टॉर्चर्ड ट्रुथ’ या अनुवादित इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी, २५ नोव्हेंबर रोजी एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात झाले. याप्रसंगी डॉ. भागवत यांच्यासह एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, डॉ. पटेल, सामाजिक कार्यकर्ते मेहताबखाँ पठाण, मुस्लीम राष्ट्रीय मंचचे संरक्षक डॉ. इंद्रेशकुमार भाईसाब यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
‘एमजीएम’ला छावणीचे स्वरूप
डॉ. भागवत पुढे म्हणाले, पुस्तकातून प्रामाणिक अनुभव समोर येतातच; परंतु आयुष्यात काटेच अधिक सोसूनही स्वभावात व विचारात कडवटपणा, इतरांविषयी द्वेषभावना येऊ न देता दृढतेने माणुसकी जपण्याची व टिकवून ठेवण्याची आणि त्यासाठी परिस्थितीवर मात करण्याच्या जिद्दीचीही शिकवणही मिळते. यामागे इतरांचे दु:ख कमी करण्याची अंत:प्रेरणा व करुणा असून, हीच आस्तिक्य बुद्धी आहे.
ही शिकवण पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित होणे गरजेचे आहे, याकडेही डॉ. भागवत यांनी लक्ष वेधले. तर, पुस्तकाचे कौतुक करीत, पुस्तक विकत घेऊन आवर्जून वाचण्याचे आवाहन अंकुशराव कदम यांनी याप्रसंगी केले. सरसंघचालक डॉ. भागवत यांना झेड प्लस सुरक्षा असल्यामुळे एमजीएम विद्यापीठ परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता, जणुकाय संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी होता. पत्रकारांनाही प्रवेश नाकारण्यात आला.
Read About : Public Festival Noise Pollution 2026 – उत्सव साजरे करा; मात्र नागरिकांना सक्तीचे श्रोते बनवू नका!
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.