नबी करीम, पहाडगंज आणि करोल बाग परिसरात एकाच वेळी कारवाई; १५ जणांना अटक
नवी दिल्ली : Delhi Police Raid on Spa Centres स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाविरोधात दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. सेंट्रल डिस्ट्रक्टि पोलिसांनी राजधानीतील चार स्पा सेंटरवर एकाच वेळी छापेमारी करत २९ महिलांची सुटका केली असून, १५ जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत चार गुन्हे, तर पोलीस पडताळणी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेनुसार दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कशी झाली कारवाई?
नबी करीम, पहाडगंज आणि करोल बाग पोलीस ठाण्यांच्या पथकांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खात्री करण्यासाठी या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला आणि कारवाई केली.
चार स्पा सेंटरवरील कारवाईचा तपशील
ए-वन स्पा अँड सैलून (पहाडगंज): रामनगर परिसरातील या सेंटरवर २६ नोव्हेंबर रोजी छापा टाकून ६ महिलांची सुटका करण्यात आली. स्पा मालक, सह-मालक आणि मॅनेजरसह ८ जणांना अटक झाली.
ऑर्गेनिक स्पा (पहाडगंज): मेन बाजारमधील या स्पामधून ३ महिलांची सुटका केली गेली. स्पा मॅनेजर संप्रीता झा हिच्यासह रोख रक्कम आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले.
मौर्या स्पा (करोल बाग): येथे बनावट ग्राहकाकडून अतिरिक्त सेवेसाठी १,५०० रुपये घेतल्याचे समोर आले. पोलिसांनी १० महिलांची सुटका करत दोन मॅनेजर (शुभंकर आणि निधी सोनी) तसेच चार ग्राहकांना पकडले.
हेरिटेज स्पा (करोल बाग): टँक रोडवरील या स्पामधून १० महिलांची सुटका करण्यात आली असून, २० वर्षीय रिसेप्शनिस्ट-कम-मॅनेजर सूरज याला अटक केली आहे.
याशिवाय, पटेल नगर पोलिसांनी आपल्या कर्मचाऱ्यांची अनिवार्य पोलीस पडताळणी न केल्याप्रकरणी द पॅलेस स्पा आणि द गॅलेक्सी स्पाच्या मॅनेजरविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आल्याचे डीसीपी रोहित राजबीर सिंह यांनी सांगितले.
Read About : Journalists vs Reel Makers : रील बनवणारे पत्रकार नाहीत? दिल्ली पोलिसांचं सुप्रीम कोर्टात मोठं विधान
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.