Ad Advertisement Ad Advertisement

Cabinet meeting – पालघरमध्ये प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायालयाची होणार स्थापना; मंत्रिमंडाचा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक

मुंबई : Cabinet meeting – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत पालघर जिल्ह्यासाठी पालघर येथे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायालय तसेच मुख्य दंडाधिकारी न्यायालयाची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिगण उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीत अन्य तीन निर्णयही घेण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय
  • पालघर जिल्ह्यासाठी पालघर येथे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायालय तसेच मुख्य दंडाधिकारी न्यायालयाची स्थापना होणार. सरकारी वकील कार्यालयांसह अनुषांगिक पदांच्या निर्मितीस मंजुरी.
  • नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना.
  • राज्यातील उच्च आणि तंत्र शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रात होऊ घातलेले बदल लक्षात घेऊन सुधारणा करण्यात येणार.
  • एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा. पालघर जिल्ह्याचा आता झोन – 1 मध्ये समावेश. झोन – 4 वर्गवारी रद्द आणि विस्तारीकरण नियमातही बदल.

Read About : Balasaheb Thackeray Death Anniversary – संकटात असलेल्या बळीराजाला शिवसेनेकडून शक्य ती मदत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.