मेट्रो प्रवासाचा व्हिडीओ केला ट्वीट
मुंबई : Aqua Metro Project – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ग्रँट रोड ते मरोळ नाका असा भूमिगत मेट्रोने प्रवास केला. त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट करतानाच, मुंबईतील भूमिगत ॲक्वा मेट्रोचा पाया तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात रचण्यात आल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मुंबईचे पालकमंत्री असताना आपणच भूमिगत मेट्रोचा आग्रह धरला होता, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंचे जतन तसेच मंत्रालय आणि विधान भवन परिसरातील वर्दळ लक्षात घेता उन्नत मार्गिकेऐवजी भूमिगत मेट्रो आवश्यक असल्याची भूमिका मांडल्यानंतर मंत्रिमंडळाने त्यास मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. आज या मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुकर होत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
प्रकल्पाच्या श्रेयावरून पुन्हा चर्चा
मुंबईच्या या भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत विविध सरकारांच्या काळात काम पुढे गेले. ॲक्वा मार्गिकेच्या सुविधेच्या निमित्ताने आता प्रकल्पाच्या मूळ संकल्पनेचे श्रेय आणि उभारणीतील योगदानाचा मुद्दा राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेत आला आहे.
Read About : वाहतूक ई-चलनांच्या दंडावर २० टक्के सवलत – 20 percent discount on e-challan
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.