Ad Advertisement Ad Advertisement

मजुर महिलेच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ऊसतोड मजूर आक्रमक -Sugarcane Worker Woman Accident Death

आर्थिक मदतीच्या मागणीसाठी मृतदेह कारखाना परिसरात आणून आंदोलन

केज Sugarcane Worker Woman Accident Death : केज येथील गंगा माऊली साखर कारखान्यावर ऊसतोड मजूर म्हणून काम करीत असलेल्या ऊसतोड मजूर महिलेचे अपघातात निधन झाले होते. त्या महिलेच्या कुटुंबियांना व आईिवना पोरक्या झालेल्या चार अल्पवयीन मुलींना साखर कारखान्याने आर्थिक मदत देण्यात यावी, यासाठी मृत महिलेचे नातेवाईक आणि ऊसतोड मजूर संघटनेच्या नेत्यांनी मृतदेह कारखान्याच्या परिसरात आणून ठेवला होता. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

केज येथील गंगा माऊली साखर कारखान्यावर ऊस तोडणीचे काम करीत असलेल्या छाया आडे आणि त्यांचे पती कृष्णा आडे (रा. चनई तांडा, ता. अंबाजोगाई जि. बीड) हे दोघे दि. २७ नोव्हेंबर रोजी ऊस तोडणीचे काम संपवून मोटार सायकलवरून जात असताना सकाळी ११:३० वा. च्या सुमारास रस्त्यावर काम सुरू असलेल्या एका जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणे जेसीबीचे खोरे लागल्याने अपघात झाला. त्यात छाया आडे या गंभीर जखमी झाल्या.

त्यांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आले होते.दरम्यान, दि. २९ नोव्हेंबर रोजी छाया आडे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. छाया आडे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या आईिवना पोरक्या झालेल्या चार मुलींना आर्थिक मदत मिळावी, म्हणून संतप्त नातेवाईक आणि ऊसतोड मजूर संघटनेचे नेते यांनी आडे कुटुंबाला साखर कारखान्याकडून आर्थिक मदत मिळावी. याकरिता छाया आडे यांचे प्रेत ठेवलेली रुग्णवाहिका कारखान्याच्या गव्हाणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, कारखाना परिसरात आणून उभी केली.

मयत छाया आडे यांच्या कुटुंबाला व तिच्या चार मुलींना जो पर्यंत आर्थिक मदत मिळत नाही. तो पर्यंत प्रेत हलवणार नाही आणि अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. कारखान्याचे अधिकारी त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत नसल्याने नातेवाईक आणि ऊसतोड मजुरांनी कारखान्याकडे धाव घेत कारखान्याच्या गव्हाणीकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु कारखान्याचे सुरक्षा रक्षक आणि पोलिस यांनी त्यांना रोखले. त्यामुळे काही काळ मयताचे नातेवाईक आणि कर्मचारी यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त

त्या नंतर सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम आणि पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी कारखान्याच्या व्यस्थापकांशी फोनवरून संपर्क साधून ऊसतोड संघटनेचे नेते तिडके, जीवन राठोड व पदाधिकारी, मयताचे नातेवाईक यांच्यात समन्वय घडवून कारखान्याकडून मयत कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी राजी केले. त्या नंतर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबाला आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त केल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या मूळ गावी रवाना केला.

Read About : फवाद-माहिराच्या सीरिजला भारतात विरोध! – Jo Bache Hain Samet Lo Controversy
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.