तब्बल 11 प्रमुख भाषांत आधार अपडेट, पत्ता बदल, ई-केवायसी आणि मोबाईल लिंकिंगची माहिती देणार, डॅफोडिल सॉफ्टवेअरकडून विकसित
गुरुग्राम (हरयाणा) : Aadhaar Uidai AI Mascot कोलकाता येथे पार पडलेल्या १७ व्या ‘आधार दिना’चे औचित्य साधून आयोजित ‘आधार संवाद २०२६’ या कार्यक्रमात ‘डॅफोडिल सॉफ्टवेअर’ या कंपनीने ‘उदय’ या एआय-आधारित व्हर्च्युअल मस्कॉटचे अनावरण केले. नागरिक आता आपल्या रोजच्या भाषेमध्ये बोलून आधार कार्डशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या ‘उदय’ सहाय्यकाकडून मिळवू शकणार आहेत.
युआयडीएआयच्या अधिकृत माहितीचा वापर करून बनवण्यात आलेला हा एआय सहाय्यक नागरिकांचे बोलणे ऐकून, समजून घेऊन, योग्य हातवारे आणि ओठांच्या हालचालींसह लागलीच उत्तर देतो.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान
११ भारतीय भाषांत उत्तरे देण्याची क्षमता : ‘उदय’ हा एआय मस्कॉट मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, बंगाली, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, पंजाबी आणि उडिया या ११ प्रमुख भाषांमध्ये संभाषण करू शकतो.
अचूक आणि अधिकृत माहिती : Aadhaar Uidai AI Mascot नागरिक आधार अपडेटचा खर्च, पत्ता बदलण्यासाठी लागणारी कागदपत्रे, बँक खाते किंवा मोबाईल नंबर आधारशी कसा लिंक करावा, ई-केवायसी आणि व्हर्च्युअल आयडी यांसारख्या विविध प्रश्नांची उत्तरे सहज मिळवू शकतात. हा असिस्टंट केवळ यूआयडीएआयच्या अधिकृत दस्तऐवजांच्या आधारेच उत्तरे देतो. Aadhaar Uidai AI Mascot
परवडणारे तंत्रज्ञान : महागड्या ग्राफिक्स हार्डवेअरऐवजी वेब ब्राउझर आणि साध्या सर्व्हरवर चालणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा मस्कॉट तयार करण्यात आला आहे. यामुळे कमी खर्चात देशभरात याचा वापर करणे शक्य होणार आहे.
त्रिस्तरीय सुरक्षा : या एआय मस्कॉटमध्ये सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. यात चुकीची माहिती न देणे, शिवीगाळ किंवा आक्षेपार्ह भाषा रोखणे आणि मुख्य विषय सोडून भलतेच उत्तर न देणे यावर कडक नियंत्रण ठेवण्यात आले आहे.
दोन टप्प्यांत होणार लागू
सुरुवातीला हा एआय मस्कॉट देशभरातील आधार केंद्रांवर बसवला जाईल, जेणेकरून तेथे येणारे नागरिक स्वत:हून माहिती मिळवू शकतील आणि कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल.
Aadhaar Uidai AI Mascot पुढील टप्प्यात हा मस्कॉट यूआयडीएआयची अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध केला जाईल, ज्यामुळे सध्याच्या मजकूर आधारित (टेक्स्ट-बेस्ड) चॅटबॉटची जागा हा व्हर्च्युअल मस्कॉट घेईल.
Read About : Ayushman Card application : आयुष्मान कार्ड बनवताना ही घ्या काळजी – 2026
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.