अमेरिका, स्वीडन आणि तैवानमधील रुग्णांच्या डेटावर संशोधन
बर्कले (कॅलिफोर्निया) : AI Heart Scan कोणतीही पूर्वसूचना किंवा स्पष्ट लक्षणे न दिसता अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण जगभरात मोठे आहे. मात्र, आता वैद्यकीय क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल टाकत संशोधकांनी अशी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित केली आहे, जी नियमित ईसीजी आणि हार्ट स्कॅनमध्ये लपलेले अत्यंत सूक्ष्म संकेत ओळखून भविष्यातील संभाव्य धोका आधीच वर्तवू शकते.
युसी बर्कले येथील संशोधक झियाद ओबरमेयर आणि त्यांच्या पथकाने स्वीडनमधील तब्बल ४,४०,००० हून अधिक रुग्णांच्या ईसीजी डेटावर या एआय मॉडेलला प्रशिक्षित केले आहे. त्यानंतर अमेरिका आणि तैवानमधील हजारो रुग्णांच्या नोंदींवर याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
असे आहे संशोधन
मानवी डोळ्यांना किंवा डॉक्टरांना सामान्य तपासणीत न दिसणाऱ्या हृदयाच्या विद्युत लहरींमधील सूक्ष्म बदलांना (उदा. हृदयाच्या स्नायूंमधील सूक्ष्म व्रण किंवा फायब्रोसिस) हे एआय अचूकपणे टिपते. पारंपरिक अल्ट्रासाऊंड चाचण्यांच्या तुलनेत हे तंत्रज्ञान अधिक प्रभावी ठरले आहे. पारंपरिक निकषांनुसार सुरक्षित समजल्या गेलेल्या ८६ टक्क्यांहून अधिक अति-धोकादायक रुग्णांचा धोका या एआयने अचूक ओळखला. संशोधनाच्या निष्कर्षांनुसार, अति-धोकादायक रुग्णांना वेळेवर पेसमेकर, डिफिब्रिलेटर किंवा योग्य औषधोपचार देऊन त्यांचे प्राण वाचवणे शक्य होणार आहे. सध्या या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष रुग्णालयांमध्ये चाचणी सुरू असून, भविष्यात ते स्मार्टवॉचसारख्या उपकरणांमध्येही वापरले जाऊ शकते.
Read About : Bengaluru Smoking Ban – बंगळुरूत हॉटेल, पब, बारमध्ये धूम्रपानबंदीचा प्रस्ताव
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.