Ad Advertisement Ad Advertisement

Beed Ambulance Denial Case पैसे नसल्याने बेशुद्ध मुलीला रुग्णवाहिका नाकारली

बीड जिल्ह्यातील घटना : वैद्यकीय अधिकाऱ्याचा पदभार काढला

Beed Ambulance Denial Case बीड : फिट आल्याने बेशुद्ध झालेल्या अवघ्या ११ वर्षीय मुलीला उपचारासाठी बीड येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, रुग्णवाहिकेच्या डिझेलसाठी पैसे नसल्याने या मुलीला शासकीय रुग्णवाहिका नाकारण्यात आली. हा प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडल्याचा आरोप होत असून या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचा पद्भार काढण्यात आला आहे. ही घटना २९ सप्टेंबर रोजी घडली होती.

दिंद्रुड येथील जिल्हा परिषद शाळेत पाचवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला शाळेत अचानक फिट आल्याने मुख्याध्यापक मनोहर कटारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिला तातडीने दिंद्रुड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश ढाकणे यांनी तिला पुढील उपचारासाठी रेफर करण्याचा सल्ला दिला. मात्र, यावेळी मुलीच्या नातेवाइकांकडे रुग्णवाहिकेसाठी डिझेलच्या पैशांची मागणी करण्यात आली आणि पैसे नसल्याने त्या आजारी मुलीला रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आले असा आरोप आहे. 
  • या संपूर्ण प्रकरणात वैद्यकीय अधिकारी डॉ. ढाकणे (गट-अ) यांच्याकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे प्रथमदर्शनी प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. जनसामान्यांच्या आरोग्याशी निगडीत या संवेदनशील प्रकरणात कोणतीही तडजोड न करता, प्रशासनाने डॉ. ढाकणे यांच्याकडील दिंद्रुड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार तातडीने काढून घेतला आहे.
  • तसेच, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदींनुसार कठोर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचा प्रस्ताव लातूर परिमंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक यांच्यामार्फत मुंबई येथील आरोग्य सेवा आयुक्तांकडे तत्काळ सादर करण्यात आला आहे. शासन स्तरावरून या प्रकरणी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत डॉ. ढाकणे यांचे मुख्यालय आता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, बीड येथेच निश्चित करण्यात आले आहे.

Read About : China Armpit Hair Trend 2026 : काखेतील केस रंगवण्याची नवी फॅशन!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.