Ad Advertisement Ad Advertisement

Beed Bus-Car Accident : बस-कारच्या भीषण अपघातात 5 ठार

तुळजापूरला दर्शनासाठी जाताना अपघात; मृतांमध्ये माजलगावच्या चौघांचा समावेश

Beed Bus-Car Accident माजलगाव (जि. बीड) : खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर पात्रुडजवळ रविवारी (दि. १८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये माजलगाव येथील चौघांचा, तर राजस्थानमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. ओंकार महादेव गिरी (२४), ऋतिक मोतीलाल बडे (२३), गजानन महादेव नामदास (३८), सोमनाथ गजानन नामदास (१२, सर्व रा. मंजरथ रोड, माजलगाव) आणि अनिल सेन आचारी (३०, रा. राजस्थान) अशी मृतांची नावे आहेत. हे पाचही जण रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कारने (एमएच २६-४२१०) माजलगाव येथून तुळजापूरच्या दर्शनासाठी निघाले होते.

लहामेवाडी तांड्याजवळील पुलावर कार आली असता, पुलावरील उंचवट्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याच वेळी तेलगावच्या दिशेने येणाऱ्या बसशी (एमएच २०-२७४०) कारची धडक झाली. या अपघातात कारमधील पाचही जणांचा मृत्यू झाला.

नागरिकांकडून मदतकार्य

अपघाताचा आवाज ऐकून जवळच्या पेट्रोलपंपावरील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना माहिती देत मदतकार्य सुरू केले. कारमधील व्यक्तींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. पात्रुडचे सरपंच लतीफ मोमीन, एकनाथ मस्के, ग्रामसेवक भागवत भुजबळ, संदीप जाधव आणि प्रदीप कापसे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मदतकार्यात सहभाग घेतला.

माजलगावमध्ये हळहळ

अपघातातील पाचही जणांना माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दर्शनासाठी नेलेली फुले रस्त्यावर

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सोबत घेतलेली फुले अपघातानंतर रस्त्यावर विखुरली होती. अपघातस्थळी उपस्थित नागरिकांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली.

Read About : Paracetamol Liver Damage : पॅरासिटामॉल जेवढे चांगले तेवढेच वाईट

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.