आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर शून्य गुरुत्वाकर्षणात ग्लिओब्लास्टोमाच्या पेशींचे संवर्धन; कर्करोगाची वाढ आणि रचना समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांना मोठे यश
मुंबई : Brain Cancer Cells Grown in Space वैद्यकीय संशोधनात शास्त्रज्ञांनी अंतराळात म्हणजेच शून्य गुरुत्वाकर्षण वातावरणात मेंदूच्या अत्यंत घातक अशा कर्करोगाच्या पेशींचे संवर्धन करण्यात यश मिळवले आहे. अंतराळ विज्ञानाचा वापर करून मानवी शरीरातील सर्वात क्लिष्ट आजारावर मात करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
ग्लिओब्लास्टोमा हा मेंदूच्या कर्करोगाचा असा प्रकार आहे, ज्यावर उपचार करणे अत्यंत कठीण असते. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणामुळे या कर्करोगाच्या पेशींची त्रिमितीय रचना आणि त्यांच्या वाढीचा नेमका पॅटर्न समजून घेण्यात अनेक मर्यादा येतात. पृथ्वीच्या वातावरणात या पेशी सपाट स्वरूपात वाढतात, ज्यामुळे मानवी मेंदूतील त्यांच्या खऱ्या स्वरूपाचा अभ्यास करणे कठीण होते.
या समस्येवर शास्त्रज्ञांनी अंतराळात उपाय शोधला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर शून्य गुरुत्वाकर्षण असल्यामुळे या कर्करोगाच्या पेशी अगदी मानवी मेंदूत वाढतात तशाच हुबेहूब त्रिमितीय आकारात वाढल्या. अंतराळात मिळालेल्या या यशामुळे शास्त्रज्ञांना ग्लिओब्लास्टोमा पेशींची अंतर्गत रचना, त्यांची वाढ आणि ते निरोगी पेशींवर कसा हल्ला करतात, हे अत्यंत बारकाईने समजून घेता येत आहे.
या नाविन्यपूर्ण संशोधनामुळे ब्रेन कॅन्सरवर अत्यंत प्रभावी आणि अचूक काम करणारी नवीन औषधे शोधणे आता खूप सोपे होणार आहे. पृथ्वीच्या तुलनेत अंतराळात होणारा हा पेशींचा अभ्यास कर्करोग उपचाराचा वेग कैक पटीने वाढवणार आहे.
Read About : OpenAI Mathematical Breakthrough – ‘ओपनएआय’चा गणित, भौतिकशास्त्रात पराक्रम!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.