Ad Advertisement Ad Advertisement

OpenAI Mathematical Breakthrough – ‘ओपनएआय’चा गणित, भौतिकशास्त्रात पराक्रम!

ईटीएच सिद्धांताला आव्हान; काकेया कन्जेक्चर आणि यांग-मिल्स थिअरीसह अनेक कठीण गणितीय समस्यांवर एआयने पुरावे मांडल्याचा ओपनएआयचा दावा

नवी दिल्ली : OpenAI Mathematical Breakthrough आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रातील नामांकित कंपनी ‘ओपनएआय’ ने विज्ञान आणि गणिताच्या जगतात एक नवा इतिहास रचला आहे. ओपनएआयच्या एआय मॉडेलने गणित, संगणक शास्त्र आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील अनेक वर्षांपासून न सुटलेल्या जटिल सिद्धांतांचे गणितीय पुरावे तयार केले आहेत.

कंपनीने यासंदर्भात तीन मोठे यश संपादन केल्याचे जाहीर केले असून, यामध्ये संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) जगतात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘एक्सपोनेंशियल टाइम हायपोथेसिस’ (ईटीएच) हा सिद्धांत एआयने खोटा ठरवला आहे. OpenAI Mathematical Breakthrough

कॉम्प्युटर सायन्सला नवे वळण

OpenAI Mathematical Breakthrough गेल्या अनेक वर्षांपासून ‘ईटीएच’ या सिद्धांताचा वापर संगणकाद्वारे समस्या किती वेगाने सोडवल्या जाऊ शकतात हे ठरवण्यासाठी केला जात होता. ओपनएआयच्या यंत्रणेने हा सिद्धांत चुकीचा असल्याचे सिद्ध केले असून, ‘लीन’ या ऑपचारिक पडताळणी (फॉर्मल व्हेरीफिकेशन) प्रणालीद्वारे या पुराव्याची पडताळणीही करण्यात आली आहे. यामुळे आता आलेख सिद्धांत (ग्राफ थिअरी), संगणकीय जीवशास्त्र (कॉम्प्युटेशनल बायोलॉजी) आणि डेटाबेस क्षेत्रातील काम अधिक वेगाने करणाऱ्या अल्गोरिदमच्या शोधाला नवी दिशा मिळणार आहे.

गणितातील अनेक वर्षांची कोडी सुटली

एआय मॉडेलने ‘हार्मोनिक ॲनालिसिस’ मधील सर्व परिणामांसाठी ‘लोकल स्मूथिंग कन्जेक्चर”चा पुरावा सादर केला आहे. ओपनएआयच्या मते, यामुळे गणितातील प्रसिद्ध ‘काकेया कन्जेक्चर’ आणि ‘स्टाईन्स रेस्ट्रक्शिन कन्जेक्चर’ हे प्रश्नही आपोआप सुटले आहेत. OpenAI Mathematical Breakthrough

भौतिकशास्त्रातील क्रांती

सैद्धांतिक भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात, एआयने चार परिमाणे असलेल्या ‘क्वांटम फील्ड थेअरी’ आणि ‘क्वांटम क्रोमोडायनॅमिक्स’ (क्यूसीडी) साठी गणितीयदृष्ट्या अचूक पुरावे दिले आहेत. याशिवाय गणितातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या ‘यांग-मिल थेअरी’च्या अस्तित्वाचा पुरावाही एआयने मांडला आहे.

पुढील वाटचाल आणि पारदर्शकता

या अभूतपूर्व शोधांनंतर, जगभरातील स्वतंत्र शैक्षणिक तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ या पुराव्यांची सखोल तपासणी करणार आहेत. ओपनएआयने कॉम्प्युटर सायन्सशी संबंधित पुरावे सर्व संशोधकांसाठी खुले करण्याचे ठरवले आहे.

या शोधांवर चर्चा करण्यासाठी ओपनएआय एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करणार असून, या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘सायमन्स फाउंडेशन’ला ५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची (सुमारे ४१ कोटी रुपये) मदत जाहीर केली आहे. विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात एआयचा वापर एका नव्या युगाची सुरुवात करेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

Read About : Ancient Ice in Tibet – तिबेटमध्ये हिमयुगातील बर्फ अजूनही शाबूत!

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.