मेंदूतील खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करण्याची नैसर्गिक यंत्रणा संशोधकांनी शोधली
झ्युरिच (स्वित्झर्लंड) : Brain Regeneration प्रौढ मानवी मेंदूमध्ये झालेली दुखापत किंवा आजारपणामुळे नष्ट झालेल्या पेशी स्वत:हून पुनरुज्जीवित करण्याची एक अद्भूत क्षमता असते, याचा शोध युनिव्हर्सिटी ऑफ झ्युरिच च्या शास्त्रज्ञांनी लावला आहे. मेंदूतील विशिष्ट पेशी नव्याने तयार झालेले पेशी-केंद्रक लांब अंतरापर्यंत वाहून नेऊन खराब झालेल्या भागाची दुरुस्ती करतात, हे जिवंत उंदरांच्या मेंदूमध्ये शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष पाहिले असून यामुळे मेंदूच्या बरे होण्याच्या क्षमतेविषयीच्या जुन्या समजुती बदलू शकतात.
असे आहेत संशोधन
आतापर्यंत शास्त्रज्ञांचा विश्वास होता की प्रौढ मेंदू नष्ट झालेल्या ॲस्ट्रोसाइट्स पेशींची पूर्णपणे भरपाई करू शकत नाही. हे ताऱ्याच्या आकाराचे सेल्स न्यूरॉन्सना पोषक द्रव्ये पुरवणे, रक्तप्रवाह नियंत्रित करणे आणि मेंदूच्या ऊतींचे रक्षण करण्याचे काम करतात. मेंदूला झालेली दुखापत किंवा न्यूरोमायलिटिस ऑप्टिका सारख्या गंभीर ऑटोइम्यून आजारांमुळे या पेशी नष्ट होतात.
प्राध्यापक ब्रुनो वेबर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने टू-फोटॉन मायक्रोस्कोपी या प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून जिवंत मेंदूचे अनेक आठवडे निरीक्षण केले. यात दिसून आले की, जखमेच्या कडेला असलेल्या विशेष रिजनरेटिव्ह ॲस्ट्रोसाइट्स पेशी केवळ नवीन पेशी तयार करण्यासाठी विभाजित होत नाहीत, तर त्या त्यांच्या लांब, शाखायुक्त भागांमधून नव्याने तयार झालेले केंद्रक सरकवत थेट खराब झालेल्या भागापर्यंत पोहोचवतात आणि ॲस्ट्रोसाइट्सचे विस्कळीत झालेले जाळे पुन्हा विणतात.
संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांनी मेंदू स्वत:ची दुरुस्ती करत असताना तात्पुरत्या स्वरूपात सक्रिय होणारे विशिष्ट जनुक आणि जैविक सिग्नलिंग पाथवे ओळखले आहेत. याचा वापर करून भविष्यात अर्धांगवायू, मेंदूचा झटका किंवा अपघाती दुखापतींनंतर मेंदूला पूर्ववत करण्यासाठी नवीन औषधोपचार विकसित करणे शक्य होणार आहे.
Read About : Cancer Cell Targeted Drug Delivery – कर्करोगाच्या पेशी स्वतःच तयार करणार त्यांना नष्ट करणारे औषध; जपानी संशोधकांचा अभिनव प्रयोग
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.