Ad Advertisement Ad Advertisement

China Smart Farming – चीनची ‘स्मार्ट शेती’! कमी जागेत अधिक उत्पादनाचं तंत्र भारतासाठी किती उपयोगी?

शेतीत ड्रोन, सेन्सर्स, सुधारित बियाणे आणि आधुनिक सिंचनाचा वापर; भारतीय शेतकरी या तंत्रज्ञानातून काय शिकू शकतात?

मुंबई : China Smart Farming जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? बरोबर, आपला भारत! पण भारताच्या आधी हा विक्रम कोणाच्या नावावर होता? चीन! चीनकडे भारतापेक्षा शेतीयोग्य जमीन कमी आहे. पण तरीही, चीन आपल्यापेक्षा दुप्पट अन्नधान्य पिकवतो! हे कसं शक्य झालं? त्याचं उत्तर आहे, आधुनिक कृषी तंत्रज्ञान. आज आपण पाहणार आहोत की, चीनने शेतीत कोणती क्रांती केली आहे, त्यांची उत्पादकता कशी वाढली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे… काय हे तंत्रज्ञान ? तसेच आपल्या भारतात वापरणं शक्य आहे? समजून घ्या या रिपोर्ट मधून.आजची माहिती तुमच्या शेतीचा दृष्टिकोन बदलणार आहे! चीनच्या शेतीचं सर्वात मोठं वेगळेपण म्हणजे ‘स्मार्ट आणि अचूक शेती’. तिथे शेती फक्त मजुरांवर अवलंबून नाही, तर ती विज्ञानावर चालते.

कशी ते समजून घेवू..

१. ड्रोनचा मोठा वापर: चीनमध्ये खतं टाकणं असो किंवा कीटकनाशक फवारणी, हे काम मिनिटांत ड्रोनद्वारे होतं. यामुळे वेळेची आणि पैशांची मोठी बचत होते.
२. ५जी (5G) आणि आयओटी तंत्रज्ञान: चीनने त्यांच्या शेतात सेन्सर्स बसवले आहेत. हे सेन्सर्स मातीमध्ये किती ओलावा आहे, पिकाला कोणती कीड लागली आहे, याची थेट माहिती शेतकऱ्याच्या मोबाईलवर देतात.
३. व्हर्टिकल फार्मिंग: शहरांच्या जवळ जमिनीची कमतरता असल्यामुळे, चीनने बहुमजली इमारतींमध्ये शेती करायला सुरुवात केली आहे. एकावर एक थर रचून तिथे भाज्या आणि फळं पिकवली जातात.
आता प्रश्न येतो की, या तंत्रज्ञानामुळे चीनची उत्पादकता नक्की कशी वाढली?

याची मुख्य ३ कारणं आहेत:

१. हायब्रिड बियाणे : चीनचे शास्त्रज्ञ युआन लाँगपिंग यांनी अशा भाताचा शोध लावला, जो कमी पाण्यात आणि कमी जागेत दुप्पट उत्पादन देतो. आज चीन या बियाण्यांमुळे अन्नधान्यात आत्मनिर्भर आहे.
२. नियंत्रित शेती (Greenhouse Technology): चीनमध्ये मैलोन्मैल पसरलेले काचेचे किंवा प्लास्टिकचे ग्रीनहाऊस आहेत. तिथे तापमान, प्रकाश आणि पाणी संगणकाद्वारे नियंत्रित केले जाते. यामुळे ऋतू कोणताही असो, पीक उत्तमच येते.
३. ‘टेरेस फार्मिंग’ : चीनमध्ये खूप डोंगर आहेत. त्यांनी डोंगरांचे रूपांतर पायऱ्यांच्या शेतीत केले. तिथे पाण्याचे नियोजन असे केले आहे की, वरच्या पायरीवरून पडणारे पाणी खालच्या पिकाला मिळते. पाण्याचा एक थेंबही वाया जात नाही.
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न: हे तंत्रज्ञान भारतात येऊ शकतं का?
याचं उत्तर आहे होय, नक्कीच शक्य आहे! पण काही अटींवर.
भारतात आणि चीनमध्ये एक मोठी साम्य आहे. दोन्ही देशांत लहान शेतकरी जास्त आहेत. मग आपण चीनकडून काय शिकू शकतो?
पहिली गोष्ट – ड्रोनचा वापर: भारतात आता ड्रोनला परवानगी मिळाली आहे. आपल्या गावातील तरुणांनी एकत्र येऊन ड्रोन भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला, तर लहान शेतकऱ्यांनाही कमी खर्चात फवारणी करता येईल. काही शेतकऱ्यांच्या मुलांनी हा व्यवसाय एकत्र येऊन सुरू केला आहे. परंतु त्यांची संख्या कमी आहे. त्यात वाढ होणे गरजेचे आहे.
दुसरी गोष्ट – पॉलिहाऊस आणि ड्रिप तंत्रज्ञान: चीनप्रमाणे आपणही इस्रायली आणि चायनीज पद्धतीचे पॉलिहाऊस वापरून भाजीपाल्याचे उत्पादन तिप्पट करू शकतो.
तिसरी गोष्ट – सहकारी शेती : चीनमध्ये शेतकरी एकत्र येऊन गट शेती करतात. भारतातही जर ४-५ शेतकऱ्यांनी मिळून एकत्र तंत्रज्ञान खरेदी केले, तर खर्च खूप कमी होईल.
पण मित्रांनो, आपल्याला वास्तवाचे भान ठेवावे लागेल. चीनचे तंत्रज्ञान भारतात जशास तसे आणण्यात काही मोठी आव्हाने आहेत.
चीनमध्ये हुकूमशाही आहे, सरकार जमिनी स्वतः ताब्यात घेऊन शेती करू शकते. भारतात लोकशाही आहे, प्रत्येक शेतकऱ्याची स्वतःची जमीन आहे.दुसरे म्हणजे, भारतात वीज आणि इंटरनेटची उपलब्धता अजूनही ग्रामीण भागात पूर्ण वेळ नाही. तसेच, आपल्या लहान शेतकऱ्यांकडे एवढे महागडे तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी भांडवल नाही.
आजच्या व्हिडिओचे फायनल कन्क्लूजन काय..आपल्याला चीनची नक्कल करायची नाही, तर त्यांच्याकडून ‘स्मार्ट आयडिया’ घ्यायची आहे.
जेव्हा भारताचा तरुण शेतकरी मोबाईल आणि तंत्रज्ञानाचा वापर फक्त मनोरंजनासाठी नाही, तर शेतीची माहिती घेण्यासाठी करेल, तेव्हा खऱ्या अर्थाने भारतात ‘कृषी क्रांती’ येईल. सरकारकडून अनुदानाचा फायदा घेणे आणि गटाने शेती करणे, हाच यावरचा खरा उपाय आहे. तंत्रज्ञान महाग असलं, तरी आपली जिद्द स्वस्त नाही!

Read About : Fungal disease resistance in rice, wheat and sorghum – भात, गहू अन् ज्वारीचे पीक बुरशीपासून सुरक्षित राहणार
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.