Ad Advertisement Ad Advertisement

Dharashiv Hotel Owner Murder परप्रांतीय वेटरकडून हॉटेल मालकाचा खून 2026

धाराशिव तालुक्यातील घटना : सहकारी वेटर रागवत असल्याने मालकावर काढला राग, आरोपी फरार

Dharashiv Hotel Owner Murder धाराशिव : तालुक्यातील भंडारी शिवारात हॉटेलमधील सहकारी वेटर सतत रागवत असल्याने याचा राग मनात धरून एका परप्रांतीय कामगाराने थेट हॉटेल मालकाच्याच डोक्यात हत्याराने वार करून त्याचा खून केला. ही घटना गुरुवार (दि.१५) च्या मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली असून घटनेनंतर परप्रांतीय वेटर फरार झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत धिरज धर्मराज सोमवंशी (वय २४ रा.आरणी ता. लोहारा) यांचे भंडारी शिवारात आरणी पाटीजवळ हॉटेल शिवार बार ॲन्ड रेस्टारंट आहे. या हॉटेलमध्ये आरोपी रमेश कुमार मेहर (रा.राज्य ओडीसा) हा कामगार म्हणून कार्यरत होता. या आरोपी रमेश मेहर याने दि.१५ रोजी रात्री ११.३० ते दि.१६ च्या पहाटे १ वाजेदरम्यान भंडारी शिवारातील सुवर्णा पाटील यांच्या शेतासमोर पाटील वस्तीकडे जाणाऱ्या रोडवर हॉटेल मालक धिरज सोमवंशी यांना पाठीमागून धारधार शस्त्राने डोक्यात मारून त्यांचा खून केला.

या घटनेतील आरोपी रमेश कुमार मेहर यास सोमवंशी यांच्या हॉटेलमधील दुसरा वेटर सतत रागवत असल्याचा राग मनात धरून त्याने हा खून केल्याचे मयत धिरज यांचा भाऊ शुभम सोमवंशी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. घटनेबाबत माहिती समजताच बेंबळी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत पंचनामा करून मयत धिरज यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार आरोपीच्या शोधात पथक पाठविल्याचे कळते.


वेटरला वस्तीवर सोडून परतत असताना केला हल्ला

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास हॉटेल मालक धिरज सोमवंशी हे आरोपी रमेश कुमार मेहर यास सोबत घेऊन अन्य एका वेटरला घरी सोडण्यासाठी भंडारी शिवारात असलेल्या पाटील वस्तीकडे गेले होते. तेथून सदरील कामगारास सोडून सोमवंशी व आरोपी मेहर हे परतत असताना आरोपीने पाठीमागून हॉटेल मालक सोमवंशी यांच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून फरार झाला. हा प्रकार ११.३० ते मध्यरात्री १ वाजेदरम्यान घडला आहे.

Read About: Tiger Attack in Chandrapur – वाघाच्या हल्ल्यात पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.