Ad Advertisement Ad Advertisement

Drug-Resistant Superbugs in US – अमेरिकेत औषध-प्रतिरोधक सुपरबग्सचा कहर; दरवर्षी ९७ लाख संसर्ग, ५० हजारांहून अधिक मृत्यू

CDC च्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर; रुग्णालयांमध्ये सर्वाधिक संसर्ग, आरोग्य व्यवस्थेवर दरवर्षी १२ अब्ज डॉलरचा आर्थिक भार

वॉशिंग्टन : Drug-Resistant Superbugs in US अमेरिकेत औषध-प्रतिरोधक म्हणजेच औषधांना दाद न देणाऱ्या जीवाणू आणि बुरशीचा धोका कमालीचा वाढला आहे. अमेरिकेत दरवर्षी सुमारे ९७ लाख लोक औषध-प्रतिरोधक संसर्गाचे बळी ठरत असून, यामुळे दरवर्षी ५०,८०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत आहे. असे अमेरिकेची मुख्य आरोग्य संस्था सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार नमुद केले आहे.

२०१९ मधील अशाच एका अहवालात हा आकडा २८ लाख संसर्ग आणि ३५,००० मृत्यू इतका होता. यात झालेली प्रचंड वाढ ही काळजी वाढवणारी आहे, परंतु सीडीसीने स्पष्ट केले आहे की यावेळी डेटा गोळा करण्याची पद्धत अधिक प्रगत आणि व्यापक होती, ज्यामुळे वास्तविक आकडेवारी समोर आली आहे.

रुग्णालयांमध्ये सर्वाधिक धोका आणि आर्थिक भुर्दंड

या संसर्गांपैकी बहुतांश संसर्ग हे रुग्णालयात दाखल असलेल्या किंवा उपचार घेत असलेल्या रुग्णांना होतात. अशा हॉस्पिटल-अक्कायर्ड संसर्गांमुळे ४२,००० पेक्षा जास्त मृत्यू झाले असून, यामुळे अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर दरवर्षी १२ अब्ज डॉलर्सपेक्षा (सुमारे १ लाख कोटी रुपये) जास्त आर्थिक भार पडत आहे.

धोक्याचे तीन स्तर आणि मुख्य सुपरबग्स

१. तात्काळ धोका : यामध्ये चार प्रमुख जंतूंचा समावेश आहे, जे सर्वात शक्तिशाली अँटीबायोटिक्सलाही दाद देत नाहीत. यात कँडिडा ऑरिक्स नावाच्या घातक बुरशीचा समावेश असून, तिचे रुग्ण अवघ्या ४ वर्षांत १० पटीने वाढले आहेत. तसेच लैंगिक संबंधातून पसरणारा आणि सर्व औषधांना प्रतिरोधक बनलेला गोनोरिया हा जिवाणूही यात समाविष्ट आहे.

२. गंभीर धोका : या श्रेणीमध्ये १३ जंतू आहेत. सर्वात जास्त मृत्यू (१३,८८६) पोटात संसर्ग करणाऱ्या आणि सेफॅलोस्पोरिन अँटीबायोटिकला जुमानत नसलेल्या जिवाणूंमुळे झाले आहेत. याशिवाय सुप्रसिद्ध एमआरएसए आणि टीबी चे जंतूही या यादीत आहेत.

३. दिलासादायक बाब : तीव्र जुलाब आणि आतड्याला सूज आणणारा सी. डिफ हा जिवाणू पूर्वी तात्काळ धोका श्रेणीत होता, परंतु रुग्णालयांनी घेतलेली काळजी आणि संसर्ग प्रतिबंधक उपायांमुळे त्याचे प्रमाण २१ टक्क्यांनी घटले आहे, त्यामुळे त्याला आता गंभीर श्रेणीत टाकण्यात आले आहे.

तज्ज्ञांचे मत आणि खबरदारी

डॉक्टरांच्या मते, विषाणूजन्य संसर्गांवर विनाकारण आणि अतिप्रमाणात अँटीबायोटिक्सचा वापर केल्यामुळे हे जंतू औषधांना जुमानत नाहीत. यामुळे जंतू स्वत:मध्ये बदल घडवून आणतात.

Read About : Blood Pressure Fluctuations – रक्तदाब नॉर्मल दिसला तरी धोका असू शकतो

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.