Ad Advertisement Ad Advertisement

Hera Mission : हेरा यानाने टिपली लघुग्रहाची पहिली जवळची छायाचित्रे; नासाच्या DART धडकेचे करणार सखोल विश्लेषण

पृथ्वीला लघुग्रहांच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी महत्त्वाची मोहीम; डिमॉर्फोसवरील नासाच्या धडकेचा करणार सखोल अभ्यास

पॅरिस: Hera Mission पृथ्वीच्या संरक्षणाच्या दृष्टीने युरोपीयन स्पेस एजन्सी या अंतराळ यानाने दोन वर्षांच्या प्रवासानंतर डिडिमोस या जोड-लघुग्रह प्रणालीजवळ पोहोचून तिची पहिली जवळची छायाचित्रे पृथ्वीवर पाठवली आहेत.

सुमारे ६० किलोमीटर अंतरावरून ॲस्टेरॉइड फ्रेमिंग कॅमेराद्वारे टिपलेल्या या छायाचित्रात ७८० मीटर व्यासाचा मुख्य लघुग्रह डिडिमोस स्पष्टपणे दिसत असून, त्याच्या पृष्ठभागावरील मोठे खडक आणि खड्डे प्रथमच इतक्या जवळून पाहायला मिळाले आहेत. या लघुग्रहाभोवती फिरणारा छोटा चंद्र डिमॉर्फोस मात्र सध्या सावलीत लपलेला असून, त्याची सविस्तर छायाचित्रे २५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहेत.

नेमके काय संशोधन होणार?

सप्टेंबर २०२२ मध्ये नासाच्या डार्ट यानाने पृथ्वीचे लघुग्रहांपासून संरक्षण करण्याची चाचणी घेण्यासाठी डिमॉर्फोसवर ताशी सुमारे २२,००० किलोमीटर वेगाने धडक दिली होती. या धडकेमुळे डिमॉर्फोसची कक्षा ३३ मिनिटांनी बदलली होती. आता ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रक्षेपित झालेले हेरा यान त्या धडकेच्या ठिकाणाचे नेमके पोस्टमॉर्टम करणार आहे.

या धडकेमुळे डिमॉर्फोसवर किती मोठा खड्डा पडला आहे, त्याचा आकार बदलला आहे का आणि त्याचे नेमके वस्तुमान व अंतर्गत रचना कशी आहे, याचा अभ्यास हेरा यान दोन छोट्या क्यूबसॅट उपग्रहांच्या मदतीने करेल. भविष्यात पृथ्वीच्या दिशेने येणारा एखादा महाकाय लघुग्रह वळवण्यासाठी हे संशोधन मानवजातीसाठी अत्यंत मोलाचे ठरणार आहे.

Read About : China Moon Landing 2030 : 2027 पासून चाचण्या, 2030 मध्ये दोन अंतराळवीर चंद्रावर उतरणार
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.