Ad Advertisement Ad Advertisement

Honey Singh Summons – हनी सिंगच्या अडचणी वाढणार? १६ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

दिल्लीतील कॉन्सर्टमधील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलची कारवाई; चौथ्यांदा समन्स बजावल्याचे वृत्त

Honey Singh Summons बॉलिवूडचा लोकप्रिय रॅपर यो यो हनी सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी त्याच्या गाण्यांमुळे नाही, तर एका कायदेशीर प्रकरणामुळे! दिल्लीतील एका कॉन्सर्टमध्ये केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने हनी सिंगला चौथ्यांदा समन्स बजावल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी तीन वेळा समन्स बजावूनही हनी सिंग चौकशीसाठी हजर झाला नव्हता. त्यामुळे आता त्याला १६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, यावेळीही तो चौकशीला हजर न राहिल्यास त्याच्याविरोधात लुकआउट सर्क्युलर जारी करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त आहे.

आता हनी सिंग चौकशीसाठी हजर राहणार का? आणि या प्रकरणात पुढे काय घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणातील अधिकृत घडामोडी समोर आल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होईल.

Read About : Murder in Chhatrapati Sambhajinagar – धमकीनंतर तासाभरात 19 वर्षीय तरुणाचा चाकूने खून
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.