Ad Advertisement Ad Advertisement

माणसांसारखे दिसणारे रोबोट आता कारखान्यांतही काम करणार – Humanoid Robots in China

२०२७ पासून चीनमध्ये व्यावसायिक वापराची शक्यता

नवी दिल्ली : Humanoid Robots in China – माणसांसारखे दिसणारे आणि त्यांच्याप्रमाणे काम करणारे रोबोट आता प्रत्यक्ष कारखान्यांमध्ये काम करताना दिसणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रगतीमुळे चीनमध्ये अशा रोबोटच्या निर्मितीला वेग आला आहे. २०२७ पर्यंत काही निवडक कामांसाठी त्यांचा व्यावसायिक वापर सुरू होण्याची शक्यता जागतिक वित्तीय संस्था मॉर्गन स्टॅनलीने व्यक्त केली आहे.

रोबोट निर्मितीत वाढणार गुंतवणूक

रोबोटना सूचना समजणे, वस्तू उचलणे आणि विविध कामे करता यावीत, यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी कंपन्या मोठी गुंतवणूक करणार आहेत. रोबोटसाठी कॅमेरे, संवेदक आणि यांत्रिक हात तयार करणाऱ्या कंपन्यांनाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

काम करण्याची क्षमता वाढली

एका चाचणीत रोबोटच्या कामातील यशाचा दर १९.६ टक्क्यांवरून वाढून ४१.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच प्रतिसाद देण्याचा वेळ ३३ टक्क्यांनी कमी झाला आहे.त्यामुळे रोबोट अधिक वेगाने काम करू शकतील.

चीनमधील कंपन्यांची तयारी

चीनमधील युबिटेक कंपनीने २०२६ मध्ये कारखाने आणि व्यावसायिक वापरासाठी चार हजार, तर घरगुती वापरासाठी १,५०० ते २,००० रोबोट तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गीकप्लस कंपनीही २०२६ अखेर किंवा २०२७ च्या सुरुवातीला ३०० रोबोटची पहिली तुकडी पाठवणार आहे. मात्र, रोबोटची किंमत कमी करणे आणि त्यांची कार्यक्षमता वाढवणे ही आव्हाने आहेत.

एकेकाळी विज्ञानपटांमध्ये दिसणारे रोबोट आता प्रत्यक्ष जगात उतरणार आहेत. ही तंत्रज्ञानक्रांती माणसांचे कष्ट कमी करणार की रोजगाराचे चित्र बदलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read about: प्रकाशकोड्यात वेगवान इंटरनेटचे गुपित – Barium Titanate

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.