Asia Pickleball Junior Open 2026 मधील पदकविजेत्या Aadya Vinod, Keerthi YS, Anjali Bhupendra Pol आणि Stuti यांची 2026 Junior Pickleball World Championships साठी निवड.
मुंबई, 7 सप्टेंबर: भारताच्या ज्युनियर पिकलबॉल क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. Aadya Vinod, Keerthi YS, Anjali Bhupendra Pol आणि Stuti या चार भारतीय खेळाडूंना 2026 Junior Pickleball World Championships मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळाले आहे. Asia Pickleball Junior Open 2026 मधील त्यांच्या पदकविजेत्या कामगिरीनंतर हे निमंत्रण देण्यात आले आहे.
Asia Federation of Pickleball (AFP) कडून हे विशेष निमंत्रण देण्यात आले असून, जागतिक स्तरावरील या स्पर्धेचे आयोजन 5 ते 8 नोव्हेंबर 2026 दरम्यान अमेरिकेतील टेक्सास राज्यातील Dallas येथील Brookhaven Country Club येथे करण्यात येणार आहे.
Asia Pickleball Junior Open 2026 मध्ये Aadya Vinod आणि Keerthi YS यांनी Girls Doubles 12U गटात कांस्यपदक पटकावले. तर Anjali Bhupendra Pol आणि Stuti यांनी Girls Doubles 18U गटात विजेतेपद मिळवले. AFP कडून मिळालेल्या निमंत्रणासोबत खेळाडूंना काही विशेष सुविधाही मिळणार आहेत. यामध्ये नोंदणी शुल्कात सवलत, PPA Tour व्यावसायिकांकडून आयोजित Youth Clinic मध्ये मोफत सहभाग, Courtside Tickets तसेच Player Development Initiatives मध्ये सहभागी होण्याची संधी यांचा समावेश आहे.
Junior Pickleball World Championships मध्ये 12U, 14U, 16U आणि 18U अशा विविध वयोगटांमध्ये सामने होणार आहेत. जगभरातील युवा खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्त रावर महत्त्वाचा अनुभव मिळणार आहे. All India Pickleball Association (AIPA) चे अध्यक्ष Arvind Prabhoo यांनी चारही भारतीय खेळाडूंच्या निवडीचे स्वागत केले. ही भारतीय पिकलबॉलसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी खेळाडूंच्या मेहनतीचे आणि कामगिरीचे कौतुक केले.“ही भारतीय पिकलबॉलसाठी आणि विशेषतः आपल्या युवा खेळाडूंसाठी अभिमानाची बाब आहे. Aadya, Keerthi, Anjali आणि Stuti यांनी आपल्या कामगिरी, समर्पण आणि मेहनतीच्या जोरावर ही संधी मिळवली आहे. Junior Pickleball World Championships मधील सहभागामुळे त्यांना मौल्यवान आंतरराष्ट्रीय अनुभव मिळेल. त्यांचा प्रवास देशभरातील आणखी युवा खेळाडूंना पिकलबॉलकडे वळण्यासाठी आणि मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरणा देईल,” असे Prabhoo यांनी सांगितले.
या स्पर्धेदरम्यान USA vs Asia Junior Showcase देखील आयोजित करण्यात येणार आहे. आशियातील दोन मुलगे आणि दोन मुलींची निवड करून अमेरिकेतील चार खेळाडूंविरुद्ध टीम-स्टाईल स्पर्धा खेळवली जाणार आहे. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण Pickleball TV वर करण्यात येणार आहे. भारतीय खेळाडूंसाठी ही स्पर्धा जागतिक स्तरावरील प्रतिभावान ज्युनियर खेळाडूंविरुद्ध खेळण्याची तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव मिळवण्याची महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.
