Ad Advertisement Ad Advertisement

Islam to Become World’s Largest Religion – इस्लाम बनणार जगातील सर्वात मोठा धर्म!

२०३५ पर्यंत मुस्लिमांची लोकसंख्या होणार ख्रिश्चनांपेक्षा अधिक

वॉशिंग्टन : Islam to Become World’s Largest Religion- वर्ष २०३५ पर्यंत ख्रिश्चन धर्माला पाठीमागे टाकत इस्लाम हा जगातील सर्वात मोठा धर्म बनेल, असा दावा एका नवीन अभ्यासातून करण्यात आला आहे. सध्याचा लोकसंख्या वाढीचा कल कायम राहिल्यास २०३५ नंतरच्या दशकात जागतिक धार्मिक लोकसंख्येत मोठे बदल होतील. २०७० पर्यंत जगात मुस्लिमांची संख्या ३.६ अब्जांहून अधिक होईल. ख्रिश्चनांची संख्या तीन अब्जांपेक्षा थोडी कमी राहील. तर भारत आणि जगभरातील हिंदूंची एकूण संख्या वाढून १.४ अब्ज होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अमेरिकेतील स्वतंत्र संशोधन संस्था ‘प्यू रिसर्च सेंटर’ने यासंबंधीचा अहवाल जारी केला आहे. त्यानुसार वर्ष २०२० ते २०७० दरम्यान जगातील एकूण लोकसंख्येत २९ टक्क्यांची भर पडणार आहे. या काळात ख्रिश्चन लोकसंख्येत ३० टक्के तर मुस्लिम लोकसंख्येत ८० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. हिंदू धर्म वगळता जगभरात इतर धर्मांतील लोकसंख्येचा वेग अधिक असल्याने जागतिक लोकसंख्येत हिंदूंचा वाटा १५ टक्क्यांवरून वर्ष २०७० मध्ये १४ टक्क्यांपर्यंत घसरू शकतो. वर्ष २०२० मध्ये भारतात हिंदूंची लोकसंख्या ७९.४ टक्के होती. वर्ष २०७० पर्यंत ही संख्या कमी होऊन ७५.८ टक्क्यांवर येईल. तर मुस्लिमांचा वाटा १५.२ टक्क्यांवरून १९.६ टक्के होईल.

भारताबाहेर पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येत ५० लाखहून अधिक तर अमेरिकेत ४० लाखहून अधिक वाढ होणाची शक्यता आहे. अहवालानुसार अमेरिका पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेला देश ठरेल. तर भारत आणि नेपाळ हे दोन देश हिंदू बहुसंख्य राहतील. चीन, दक्षिण कोरिया आणि जपानमधील लोकसंख्येत घट झाल्यामुळे जागतिक स्तरावर बौद्ध धर्मांच्या लोकसंख्येत घट होण्याचा अंदाज आहे. २०७० पर्यंत निम्म्याहून अधिक ख्रिश्चन लोकसंख्या उप-सहारा आफ्रिकेत असेल. याच कालावधीत ख्रिश्चन लोकसंख्येबाबत काँगो प्रजासत्ताक अमेरिकेला मागे टाकेल.

धर्मपरिवर्तन नव्हे, प्रजनन दर कारणीभूत

जगातील प्रमुख धर्मांची संख्या वाढण्यामागील सर्वात मोठे कारण हे धर्मपरिवर्तन नाही, तर त्या-त्या धर्मातील प्रजनन दर हा घटक कारणीभूत आहे. अहवालानुसार २०२० ते २०२५ दरम्यान मुस्लिम महिलांमध्ये हा दर प्रति महिला ३.१ बालके आणि ख्रिश्चन महिलांमध्ये २.५ बालके इतका होता. तर इतर धर्मांमधील महिलांमध्ये हा दर १.६ इतकाच दिसून आला. जर लोकसंख्या वाढीचा विद्यमान कल कायम राहिल्यास वर्ष २०२० ते २०७० दरम्यान भारतातील हिंदूंच्या लोकसंख्येत १७.७ कोटी वाढ होईल. तरीही भारतात गत काही दशकांमध्ये एकूण प्रजनन दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. तसेच मुस्लिम महिलांच्या तुलनेत हिंदू महिलांमध्ये प्रति महिला प्रजनन दर अधिक कमी झाला आहे.

पाकमध्ये असेल सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या

जगभरातील अनेक देशांमध्ये नास्तिक तथा कोणताही धर्म न मानणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. चीनमध्ये देखील अशा लोकांची संख्या अधिक प्रमाणात आहे. चीन वगळता इतरत्र अशा लोकांची संख्या २०७० पर्यंत १८ कोटींहून अधिक होण्याचा अंदाज आहे. झेक प्रजासत्ताक, जपान, नेदरलँड, न्यूझीलंड, उरुग्वे आणि व्हिएतनामसह १० देशांमध्ये अशा लोकांची संख्या अधिक आहे. २०७० पर्यंत दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि ब्रिटनदेखील या गटात सहभागी होऊ शकतात.

Read About : Qualcomm Layoffs – नोकरी गेली, पण इंजिनिअर खूश!

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.