Ad Advertisement Ad Advertisement

Henry Nicholls Century Against India- न्यूझीलंडची 5 गडी गमावून 243 धावांपर्यंत मजल

भारत-न्यूझीलंड कसोटी : हेन्री निकोल्सचे झुंजार शतक; केन विल्यमसनच्या विक्रमाशी बरोबरी

वेलिंग्टन :Henry Nicholls Century Against India भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपता संपता न्यूझीलंडने ५ गडी गमावून २४३ धावा केल्या. हेन्री निकोल्सने कसोटीच्या पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. या शतकासह त्याने केन विल्यमसनच्या विक्रमाची बरोबरीही केली आहे. खरं तर, वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह मैदानावर १५ डावांमधील हे हेन्री निकोल्सचे ५ वे शतक आहे.

या मैदानावर सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत तो न्यूझीलंडसाठी संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. निकोल्सप्रमाणेच विल्यमसननेही या मैदानावर ५ शतके झळकावली आहेत. मात्र, विल्यमसनने ३० डाव खेळल्यानंतर हा पराक्रम केला होता. निकोल्सने १५ डावांमध्ये ५ शतके, तसेच याच मैदानावर ४ अर्धशतके झळकावली आहेत.

पहिल्या दिवसाचा खेळ संपताना हेन्री निकोल्स २२१ चेंडूंमध्ये ११३ धावा करून खेळपट्टीवर कायम होता. त्याने या डावात १४ चौकार मारले. निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांनी सहाव्या विकेटसाठी १७३ धावांची अभेद्य भागीदारी केली.
कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. कर्णधार टॉम लॅथम एकही धाव न काढता जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर डेव्हन कॉनवे ४ धावांवर बाद झाला. १५ धावा केल्यानंतर रचिन रवींद्र आकाश दीपच्या हाती झेलबाद झाला. डॅरिल मिचेलला केवळ एक धाव काढता आली.

७० धावात ५ गडी गमावले

टॉम ब्लंडेल ५ धावांवर बाद झाला. ७० धावांवर ५ गडी गमावून अडचणीत सापडलेल्या न्यूझीलंडला निकोल्स आणि फिलिप्स यांनी सावरले. त्यांनी मिळून जवळपास दोन सत्रांमध्ये ३२२ चेंडूंचा सामना केला आणि संघाला पुढील धक्क्यांपासून वाचवले.

बुमराहने घेतले ३ बळी

९४ धावा करून फिलिप्स अजूनही खेळपट्टीवर आहे. त्याने या डावात १३ चौकार मारले आहेत. भारताकडून बुमराहने ३ बळी घेतले, तर अंशुल कंबोज आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Read About : क्रिकेट प्रवासातील २५ बॅट्स आणि वैयक्तिक वस्तू पाहण्याची संधी; एमसीएकडून कारकीर्दीचा अनोख्या पद्धतीने गौरव

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.