स्की रिसॉर्टची रिलॅक्स सफर : प्रकृतिबाबतच्या अफवांना पुर्णविराम
प्योंगयोंग : Kim Jong Un Ski Resort Visit – उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांचा एक अत्यंत वेगळा आणि कौटुंबिक अंदाज समोर आला आहे. किम यांनी नुकतीच एका नव्या स्की रिसॉर्टला भेट दिली, जिथे त्यांनी आपल्या लाडक्या लेकीला स्कीइंग करताना आनंदाने पाहिले. या सफरीदरम्यान त्यांच्या हातात सिगारेट आणि चेहऱ्यावर हास्य होते. त्यांचा हा अंदाज व्हायरल झाला आहे. किम जोंग उन यांची प्रकृती गंभीर असल्याच्या तसेच त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, लेकीसोबतच्या या छायाचित्रांमुळे या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
उत्तर कोरियन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये किम जोंग उन एका आरामदायक खुर्चीवर बसलेले असून त्यांच्या डोळ्यावर सनग्लासेस आहेत. त्यांच्या मागे पत्नी री सोल जू याही उभ्या असल्याचे दिसत आहे. या दौऱ्यात त्यांची लहान मुलगी जू ए हिने पांढऱ्या रंगाचे कपडे घालून बर्फावर स्कीइंगचा आनंद घेतला. मात्र, स्कीइंग करताना तिने सुरक्षात्मक हेलमेट घातलेले नव्हते, ज्याची बरीच चर्चा होत आहे.
उत्तराधिकारी म्हणून घडवणे सुरू
दक्षिण कोरियाच्या (सियोल) गुप्तचर यंत्रणेच्या मते, किम जोंग उन आपल्या या लाडक्या मुलीलाच भविष्यात उत्तर कोरियाची उत्तराधिकारी म्हणून तयार करत आहेत.
पवित्र पर्वताजवळ नवीन रिसॉर्ट
हे स्की रिसॉर्ट चीनच्या सीमेजवळ आणि पैक्टू पर्वताजवळ वसलेले आहे. उत्तर कोरियातील लोकांच्या विश्वासानुसार, हे पवित्र स्थान किम जोंग उन यांचे वडील किम जोंग इल यांचे जन्मस्थान मानले जाते. रिसॉर्टची पाहणी करताना किम जोंग उन यांनी येथील बांधकामाचे कौतुक केले आणि ‘सर्व इमारती अतिशय निर्दोष व कौशल्याने बांधल्या आहेत,’ असे सांगत समाधान व्यक्त केले.
Read About : World’s Largest Aerospace Expo – अमेरिकेत उभारणार भव्य एअरोस्पेस प्रदर्शन केंद्र!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.