Ad Advertisement Ad Advertisement

World’s Largest Aerospace Expo – अमेरिकेत उभारणार भव्य एअरोस्पेस प्रदर्शन केंद्र!

फ्लोरिडातील कॅनेडी अंतराळ केंद्र परिसरात जगातील सर्वात मोठे एरोस्पेस प्रदर्शन उभारण्याचा प्रस्ताव; विमान वाहतूक आणि भविष्यातील विमानांचा असेल समावेश

वॉशिंग्टन : World’s Largest Aerospace Expo फ्लोरिडातील एकेकाळच्या अंतराळ यान उतरणाऱ्या तब्बल १,९०० एकर परिसरामध्ये जगातील सर्वात मोठे एरोस्पेस प्रदर्शन केंद्र उभारण्याची घोषणा करून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या दोन वर्षांत फ्रान्सचा जगप्रसिद्ध ‘पॅरिस एअर शो’ला मागे टाकेल असा भव्य शो अमेरिकेत भरवला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

फ्लोरिडा येथील कॅनेडी अंतराळ केंद्रात आयोजित ‘मॅक्स पॉवर’ एरोस्पेस तंत्रज्ञान परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी ही महत्त्वाकांक्षी घोषणा केलीे.
या प्रस्तावित प्रदर्शनात व्यावसायिक, खासगी विमान वाहतूक आणि अंतराळ तंत्रज्ञानाचा समावेश असेल. यामुळे अमेरिकी उत्पादकांना आपली नवी उत्पादने जगासमोर मांडण्यासाठी आणि अब्जावधी डॉलर्सचे करार करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल.
”आम्ही अशा प्रकारचा एअर शो आयोजित करणार आहोत, जो जगाने यापूर्वी कधीही पाहिला नसेल. या क्षेत्रात अमेरिकेचे वर्चस्व आहे, त्यामुळे जगातील सर्वात मोठा एअर शो आपल्याकडेच व्हायला हवा,” असे ट्रम्प म्हणाले.

प्रमुख आकर्षणे आणि भविष्यातील मोहिमा
  • लाखो पर्यटकांची उपस्थिती आणि अब्जावधींचे करार : या केंद्रामुळे दरवर्षी लाखो पर्यटक फ्लोरिडात येतील आणि अमेरिकी अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
  • चंद्रावर पुन्हा मानवी पाऊल : नासाचे प्रशासक जेरेड इसाकमॅन यांच्या उपस्थितीत ट्रम्प यांनी आपल्या चालू कार्यकाळाच्या अखेरीस अमेरिकी अंतराळवीर चंद्रावर उतरवण्याचा पुनरुच्चार केला. नासाच्या नियोजनानुसार २०२७ मध्ये ‘आर्टेमिस-३’ मोहिमेद्वारे पृथ्वीच्या कक्षेत चाचण्या घेतल्या जातील, तर २०२८ मधील ‘आर्टेमिस-४’ मोहिमेद्वारे मानवी पाऊल चंद्रावर ठेवले जाईल. मंगळासाठी अणू-ऊर्जा संचलित अंतराळयान नासाच्या ‘स्पेस रिॲक्टर-१ फ्रीडम’ उपक्रमांतर्गत २०२८ च्या उत्तरार्धात अणू-ऊर्जेवर चालणारे रोबोटिक अंतराळयान मंगळाच्या दिशेने सोडले जाईल. हे यान मंगळाच्या कठीण वातावरणात लहान हेलिकॉप्टरद्वारे पृष्ठभागाचे मॅपिंग करेल.
  • सुपरसॉनिक विमानांचे पुनरागमन : पूर्वीच्या ‘कॉन्कॉर्ड’ विमानांचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले की, ध्वनीच्या वेगापेक्षा जलद चालणारी विमाने बंद पडणे हे दुर्दैवी होते. मात्र, आता तीव्र आवाज न करणारी आधुनिक सुपरसॉनिक विमाने, मानवरहित ड्रोन्स आणि इलेक्ट्रिक विमानांच्या संशोधनाला गती दिली जाईल.

Read About : AI Billionaires Bunkers : एआयच्या विनाशाची भीती की सुरक्षिततेची तयारी? टेक अब्जाधीश उभारताहेत भूमिगत बंकर्स!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.