तीतवाल-सिमारी रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार नदीत कोसळली
श्रीनगर – Kupwara Accident जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात अतिशय भीषण रस्ता अपघात झाला. तीतवाल-सिमारी रस्त्यावरून प्रवास करणारी एक कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे थेट किशनगंगा नदीत कोसळली. करनाह येथील सिमारी भागात घडलेल्या या घटनेत ५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अन्य ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना सुरुवातीला तंगधार येथील उप-जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील चांगल्या उपचारांसाठी हंदवाडा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलीस सध्या मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. कुपवाडामधील रस्ता अपघातातील जीवितहानीमुळे अत्यंत दुःखी आहे. मी जिल्हा प्रशासनाला जखमींवर सर्वतोपरी आणि सर्वोत्तम मोफत उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत, असे त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले.
वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार, जम्मू-काश्मीरमधील डोंगराळ भागातील संकरीत रस्ते, अतिवेग, धोकादायक ओव्हरटेकिंग आणि सुरक्षेसाठी आवश्यक क्रॅश बॅरियरचा अभाव यामुळे असे जीवघेणे अपघात वारंवार घडतात. या अपघातांची संख्या रोखण्यासाठी वाहतूक विभागाने डोंगराळ भागात आता विशेष तपासणी पथके तैनात केली आहेत.
Read About : Soybean Stock Fire : तेर शिवारात सोयाबीनची गंजी पेटवली; शेतकऱ्यांचे नुकसान
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.