अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा मोठा शोध : पेशींमधील सूक्ष्म प्रथिनांचे दर्शन आता शक्य
वॉशिंग्टन : Laser technology for protein imaging – मानवी शरीरातील पेशी आणि त्यातील अतिसूक्ष्म घटक कसे काम करतात, हे पाहणे शास्त्रज्ञांसाठी नेहमीच एक मोठे आव्हान राहिले आहे. मात्र, आता हे अधिक सोपे होणार आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली येथील संशोधकांनी लेसर तंत्रज्ञानावर आधारित एक अत्यंत प्रगत सूक्ष्मदर्शक (मायक्रोस्कोप) विकसित केले आहे. यामुळे पेशींमधील अत्यंत लहान प्रथिने आणि रचना अधिक स्पष्टपणे पाहता येण्याची शक्यता आहे.
संशोधकांनी लेसर फेज प्लेट नावाचे एक विशेष उपकरण तयार केले आहे. हे उपकरण क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी या आधुनिक तंत्रासोबत वापरले जाते. या पद्धतीत प्रथिनांचे नमुने अत्यंत कमी तापमानात गोठवले जातात आणि त्यांची चित्रे घेतली जातात. नेहमीच्या मायक्रोस्कोपमध्ये प्रकाशाचा वापर होतो, पण या नव्या यंत्रात लेसरचा थेट इलेक्ट्रॉन-किरणाशी संवाद होतो. यामुळे प्रतिमेतील कॉन्ट्रास्ट वाढून लहान प्रथिने आणि पेशींतील रचना अधिक स्पष्ट दिसतात.
कोणती अडचण दूर झाली?
सध्याच्या मायक्रोस्कोप तंत्रज्ञानामुळे केवळ मोठ्या आकाराची प्रथिनेच स्पष्ट दिसू शकत होती. मानवी शरीरातील बहुतांश प्रथिने खूप लहान असतात. साधारणपणे ७० किलोडॉल्टनपेक्षा लहान आकाराची प्रथिने पाहणे आजवर कठीण होते. परंतु, या नवीन लेसर तंत्रज्ञानामुळे आता ५० किलोडॉल्टन एवढी लहान प्रथिनेही पाहता येऊ लागली आहेत; तरीही प्रक्रिया कठीण आहे. येत्या काळात अगदी १७ किलोडॉल्टन इतकी अत्यंत सूक्ष्म प्रथिनेही पाहता येण्याची अपेक्षा संशोधकांनी व्यक्त केली आहे.
उपकरणाला थिया नाव
बर्कली येथील प्रमुख संशोधक डॉ. होल्गर म्युलर यांनी या नवीन उपकरणाला ह्यथियाह्ण असे नाव दिले आहे. ग्रीक पौराणिक कथांनुसार थिया ही प्रकाश आणि तेजस्वितेशी संबंधित देवता आहे. या उपकरणातील लेसर अत्यंत तीव्र असून, तो अनेक आरशांच्या साहाय्याने अनेक वेळा परावर्तित होऊन अत्यंत लहान भागात केंद्रित केला जातो, ज्यामुळे प्रतिमेतील कॉन्ट्रास्ट वाढते.
हे तंत्रज्ञान केवळ प्रथिनांची रचना पाहण्यापुरते मर्यादित नाही. पेशींच्या नैसर्गिक वातावरणात ही प्रथिने कशी काम करतात आणि एकमेकांशी कशी संवाद साधतात, याचा त्रिमितीय नकाशा तयार करणे यामुळे शक्य होणार आहे. अनेक आजारांमागे प्रथिनांच्या रचनेतील वा कायार्तील बिघाड असू शकतो. हे तंत्रज्ञान अशा रोगांची अचूक कारणे शोधण्यास मदत करू शकेल. रोगांवर प्रभावी ठरणारी नवीन औषधे तयार करण्यासाठी आणि औषधांचा पेशींवर काय परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरेल. सध्या हे तंत्रज्ञान प्रायोगिक टप्प्यावर आहे.
Read About : Ancient bird with dinosaur-like teeth – उडता न येणारा पक्षी 15 कोटी वर्षांपूर्वीही होता?
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.