Ad Advertisement Ad Advertisement

Latur District Bank Election 2026 – लातूर जिल्हा बँकेवर ‘सहकार’चे वर्चस्व

भाजपचे संख्याबळ वाढले ; 4 जागा बिनविरोध

लातूर : Latur District Bank Election: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या सहकार पॅनलने १९ पैकी १४ जागांवर विजय मिळवत बँकेवरील वर्चस्व कायम राखले. दुसरीकडे, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. रमेश कराड आणि आ. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने पाच जागा जिंकल्या. त्यामुळे काँग्रेसने बँकेची सत्ता राखली असली, तरी भाजपानेही सहकार क्षेत्रात आपली ताकद दाखवून दिली आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण १९ जागांसाठी ही निवडणूक झाली. त्यापैकी चार जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती, तर उर्वरित १५ जागांसाठी रविवार (दि. १५) रोजी प्रत्यक्ष मतदान झाले. या सर्व १९ जागांचे निकाल सोमवारी (दि. १६) रोजी जाहीर झाल्यानंतर सहकार पॅनलने १४, तर परिवर्तन पॅनलने पाच जागा मिळवल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बँकेवरील सहकार पॅनलची सत्ता कायम राहणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांनी सहकार पॅनलच्या संगीता अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव केला.

अशोक गोविंदपुरकर पराभूत

आ. रमेशअप्पा कराड यांचे पुत्र ऋषिकेश कराड यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गोविंदपुरकर यांना पराभूत केले. तर सहकार पॅनलचे धीरज देशमुख यांनीही विजय मिळवला. स्वर्गीय माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या कन्या प्रीती भोसले आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे जावई हेमंत जाधव यांनीही विजय मिळवला. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरु झालेल्या मतमोजणीनंतर दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट झाले होते. लक्षवेधी मतदारसंघाचे निकाल समोर येताच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉँग्रेस-भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. या निवडणुकीत कॉँग्रेसने सत्ता राखली असली तरी भाजपाच्या संचालकांची संख्या गतवेळपेक्षा वाढली आहे. परिवर्तन पॅनलचे ५ संचालक असणार आहेत.

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार (१४)

हेमंत जाधव, प्रीती भोसले, आशिष पाटील राजूरकर, संतोष पाटील, धीरज देशमुख, जगन्नाथ पाटील, जयेश माने, सर्जेराव मोरे, विवेक सिरसाठ, अविनाश जाधव, शेषेराव हाके, चंद्रशेखर दंडीमे, शितल पाटील आणि गीतांजली लांडगे.

परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार (५)

अरविंद पाटील निलंगेकर, अतुल गंभीरे, भगवानराव पाटील तळेगावकर, ऋषिकेश कराड आणि शोभा पवार.

Read About : Maharashtra E-Peek Pahani Deadline – ई-पीक पाहणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.