उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन
मुंबई : Maharashtra Drought – राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिली असून, काही भागांत तब्बल 40 दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याचे प्रशासनाच्या आढाव्यात समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (22 सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून, परिस्थितीनुसार आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार समितीला देण्यात आले आहेत. येत्या शनिवारपर्यंत प्राथमिक अधिसूचना काढण्यात येणार आहे. तसेच, मंत्री प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत.याशिवाय नगर विकास, गृहनिर्माण आणि कृषी विभागाशी संबंधित महत्त्वाचे निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. येत्या शनिवारपर्यंत प्राथमिक अधिसूचना काढण्यात येणार असून, मंत्री प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.
- राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल मंत्री या समितीचे अध्यक्ष असतील. परिस्थितीनुसार वेळोवेळी आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार समितीला देण्यात आले आहेत.
मोघरपाड्यातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना विकसित भूखंड
मुंबई मेट्रो मार्ग 4, 4 अ आणि 10 प्रकल्पाच्या एकात्मिक कारशेड डेपोसाठी जमीन देणाऱ्या मौजे मोघरपाडा येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने विकसित भूखंड वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली.
मोघरपाडा सर्व्हे क्रमांक 30 मधील शेतकऱ्यांना 22.5 टक्के आणि 12.5 टक्के प्रमाणात विकसित भूखंड वाटप करण्यात येणार आहे.
खारमधील म्हाडाच्या इमारतींचा समूह पुनर्विकास
मुंबईतील खार पश्चिम येथील रामकृष्णनगर परिसरातील म्हाडाच्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
परिसरातील रहिवाशांना दर्जेदार पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी समूह पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे.
धुळे शहरातील आरक्षणात बदल
धुळे शहराच्या मंजूर विकास योजनेतील महानगरपालिका हद्दीतील मौजे देवपूर येथील सर्व्हे क्रमांक 103 वरील क्रीडांगण आणि बगीच्याचे आरक्षण रद्द करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हे क्षेत्र आता सार्वजनिक-निमसार्वजनिक विभागात समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द
कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करून सन 2009 मध्ये मंजूर असलेला आकृतीबंध तात्पुरता कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान, नवीन सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यापूर्वी कृषी विभागाच्या कार्यभाराचा, उपलब्ध मनुष्यबळाचा, रिक्त पदांचा तसेच विविध संवर्गांच्या आवश्यकतेचा सर्वंकष आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये क्षेत्रीय यंत्रणेची गरज, शेतकरीकेंद्री योजनांचा कार्यभार आणि भविष्यातील प्रशासकीय गरजा यांचाही विचार केला जाणार आहे.
Read About: Maharashtra Drought Crisis : सरकारने दुष्काळ जाहीर केला नसला तरी भेगाळलेली जमीन आणि करपलेल्या पिकांनी केव्हाच केलाय..! 2026
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.