मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्हे यलो अलर्टवर
छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Rain Alert – राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई हवामान विभागाने २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला असून, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत काही भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
२२ सप्टेंबरला २९ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज
२२ सप्टेंबर रोजी नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, ठाणे, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
२३ सप्टेंबरला मराठवाडा-विदर्भातही इशारा
२३ सप्टेंबर रोजी नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, वाशिम, बुलडाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या भागांत पावसाचा अंदाज आहे.
२४ सप्टेंबरला विदर्भात जोर
२४ सप्टेंबरला सातारा, सातारा घाट, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, लातूर, नांदेड, जालना, परभणी, वाशिम, बुलडाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील काही भागांत जोरदार पावसासह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा आहे.
२५ सप्टेंबरलाही पाऊस कायम
२५ सप्टेंबर रोजी वाशिम, बुलडाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी अनावश्यकपणे घराबाहेर पडणे टाळावे. झाडाखाली किंवा उघड्या मैदानात थांबू नये. शेतकऱ्यांनीही वादळी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांनाही या काळात पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत सूचनांकडे लक्ष ठेवावे.
Read About: Maharashtra Drought Crisis : सरकारने दुष्काळ जाहीर केला नसला तरी भेगाळलेली जमीन आणि करपलेल्या पिकांनी केव्हाच केलाय..! 2026
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.