गुजरातच्या माळिया-कांडला महामार्गावर भीषण अपघात
मोरबी – Morbi Truck Accident गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात माळिया-कांडला राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. एका भरधाव, अनियंत्रित ट्रकने महामार्ग ओलांडत असलेल्या मेंढ्या-शेळ्याच्या कळपाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तब्बल २३ मेंढ्या आणि २ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ३० हून अधिक मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कच्छ जिल्ह्यातील भचाऊ येथील रहिवासी असलेले मालधारी पशुपालक विभाभाई रबारी हे आपल्या मेंढ्या घेऊन महामार्गावरून जात होते. जिओ पेट्रोल पंपजवळ जनावरांचा हा कळप रस्ता ओलांडत असताना, मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने शेळ्या-मेंढ्यांना चिरडले.
घटनेची माहिती मिळताच माळिया-मियाणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. पशुपालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजस्थानमधील जालोर येथील रहिवासी असलेल्या फरार ट्रकचालक उस्मान मोहम्मद रमजान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या संपूर्ण अपघाताचा थरार महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Read About : Firozabad Firing : पतीकडून पत्नी आणि प्रियकरावर गोळीबार; दोघे गंभीर
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.