Nana Patekar Death News: गोव्यातील निवासस्थानी अचानक मृत्यू; रुग्णालयात CPR, तरी Medico-Legal Case (MLC) का दाखल झाली?
मुंबई : Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे गोव्यातील निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही आणि पहाटे ५.२० च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या प्रकरणात रुग्णालयाने ‘मेडिको लिगल केस’ अर्थात एमएलसी नोंदवल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. हृदयविकारामुळे मृत्यू झाला असताना एमएलसीची गरज का पडली?
एमएलसी (MLC) म्हणजे नेमकं काय?
एमएलसी म्हणजे एखाद्या वैद्यकीय घटनेची कायदेशीर नोंद. अपघात, मारहाण, शस्त्राने झालेली दुखापत, विषबाधा, आत्महत्येचा प्रयत्न, भाजणे, लैंगिक अत्याचार किंवा संशयास्पद परिस्थितीतील मृत्यू अशा घटनांमध्ये रुग्णालयाकडून ही प्रक्रिया केली जाऊ शकते. पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय तपासणीसाठी आणले तरी एमएलसी नोंदवली जाते.
अचानक मृत्यू झाल्यास नियम वेगळे
Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांना घरीच हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले, अशी माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झालेला असल्यास, मृत्यूचे कारण केवळ नातेवाईकांच्या माहितीनुसार निश्चित करता येत नाही. अशा परिस्थितीत वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक ठरते. याच कारणामुळे ‘ब्रॉट डेड’ किंवा अचानक आणि देखरेखीशिवाय झालेल्या मृत्यूच्या प्रकरणात एमएलसी नोंदवली जाऊ शकते. याचा अर्थ संबंधित व्यक्तीच्या मृत्यूमागे गुन्हा आहे, असा थेट होत नाही.
एमएलसीनंतर काय होते?
एमएलसीच्या माध्यमातून रुग्णाची रुग्णालयात आणतानाची स्थिती, वेळ, उपचाराची माहिती आणि आढळलेल्या जखमा किंवा इतर वैद्यकीय बाबींची नोंद केली जाते. पुढे तयार होणारा मेडिको लिगल रिपोर्ट हा आवश्यकतेनुसार तपास यंत्रणा आणि न्यायालयासाठी महत्त्वाचा वैद्यकीय दस्तऐवज ठरू शकतो.
प्रसिद्ध व्यक्तीच्या मृत्यूत अधिक काटेकोर प्रक्रिया
नाना पाटेकर हे प्रसिद्ध अभिनेते असल्याने त्यांच्या मृत्यूबाबत कोणताही गैरसमज, अफवा किंवा भविष्यातील कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रक्रिया अधिक काटेकोरपणे पूर्ण केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एमएलसी नोंदवली जाणे म्हणजे मृत्यू संशयास्पद असल्याचे प्रमाण नाही.
Read About : Kareena Kapoor King Movie – ‘किंग’ मध्ये करीना कपूरची खास एन्ट्री
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.