Ad Advertisement Ad Advertisement

Neha Sharma AI photos and videos – एआय फोटो-व्हिडिओंवर नेहा संतापली, कायदेशीर कारवाईचा इशारा

माझ्या परवानगीशिवाय चेहरा वापरू नका, सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओ त्वरित हटवा

मुंबई : Neha Sharma AI photos and videos – एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट फोटो आणि व्हिडिओ तयार करण्याचे प्रकार वाढत आहेत. आता अभिनेत्री नेहा शर्मानेही अशा प्रकारांविरोधात आवाज उठवला आहे. तिच्या परवानगीशिवाय चेहरा वापरून एआय फोटो आणि व्हिडिओ तयार केले जात असल्याने तिने संताप व्यक्त केला आहे. असे फोटो आणि व्हिडिओ तयार करणाऱ्यांनी ते तातडीने हटवावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा तिने दिला आहे.

माझ्या चेहऱ्याचा वापर थांबवा

नेहा शर्माने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने आपल्या चेहऱ्याचा आणि ओळखीचा परवानगीशिवाय वापर करू नये, असे स्पष्ट केले आहे. यापूर्वी तयार केलेले सर्व एआय फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून तातडीने हटवावेत, अशी मागणीही तिने केली आहे.
आपल्या चेहऱ्याचा वापर करून चुकीची माहिती पसरवणे किंवा आपली बदनामी करणे अजिबात सहन केले जाणार नाही. अशा कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओसाठी आपण परवानगी दिलेली नाही, असेही नेहाने सांगितले.

बनावट अकाउंट वापरणाऱ्यांनाही इशारा

नेहाने आपल्या पोस्टमध्ये कठोर शब्दांत इशारा दिला आहे. एआय फोटो आणि व्हिडिओ तयार करणारे, ते पोस्ट करणारे तसेच इतरांना शेअर करणाऱ्या प्रत्येकाविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे तिने म्हटले आहे.
बनावट सोशल मीडिया अकाउंट वापरल्यामुळे आपली ओळख लपून राहील किंवा कारवाई टाळता येईल, असा विचार कोणीही करू नये. एआयचा वापर केला म्हणून कोणाचीही जबाबदारी संपत नाही, असेही तिने स्पष्ट केले. संबंधितांनी सर्व फोटो आणि व्हिडिओ तातडीने हटवावेत, असा इशारा देत तिने आपली पोस्ट संपवली.

लवकरच ‘संजोग’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान, नेहा शर्मा लवकरच ‘संजोग’ या पंजाबी चित्रपटात दिसणार आहे. हरीश गर्गी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, जस्सी गिल आणि हॅपी रायकोटी यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

एआय तंत्रज्ञानामुळे फोटो आणि व्हिडिओ तयार करणे सोपे झाले असले, तरी दुसऱ्याच्या चेहऱ्याचा परवानगीशिवाय वापर करणे चुकीचे आहे. नेहा शर्माने दिलेल्या या इशाऱ्यामुळे एआयच्या गैरवापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Reab About: Karnika Movie 2027 – माँ करणी मातेची गाथा आता रुपेरी पडद्यावर

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.