इजिप्त : सोशल मीडियावर प्रतिक्रियांची त्सुनामी
कैरो : Newborn baby viral video – माणूस म्हातारपणी किंवा निवृत्तीनंतर निवांत आराम करतो, पण जन्माला येताच जर एखादे बाळ अगदी राजासारखे हात डोक्याखाली घेऊन पायावर पाय टाकत रिलॅक्स बसले, तर काय म्हणाल? सध्या इजिप्तमधून असाच एक खळखळून हसवणारा व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने संपूर्ण इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
सर्वसाधारणपणे बाळ जन्माला आल्यावर रडणे, हातपाय हालवणे हे अगदी स्वाभाविक असते. कारण, ते एकदम नव्या अनोळखी जगात प्रवेश करत असते. पण इजप्तिची राजधानी कैरो येथील एका नवजात बाळाचा अंदाज पाहून डॉक्टर आणि नर्सही अवाक झाले. जन्मानंतर लगेचच हे बाळ रडणे-बिडणे सोडा अगदी मजेत हात डोक्याच्या मागे ठेवून आणि पायावर पाय ठेवून वश्रिांती घेताना दिसले. जणू काही ते सांगत आहे की, ह्यया जगात येण्याचे मला अजिबात टेन्शन नाही, मी पूर्ण तयारीने आलोय! कैरो येथील बालरोगतज्ञ डॉ. इस्लाम एल्देह यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
कूल अंदाज अनेकांना भावला
बाळाचा हा नवाबीआणि बिनधास्त अंदाज पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओवर मजेशीर प्रतक्रियिांचा पाऊस पडत आहे. कुणी म्हणतेय, ह्यहा नक्कीच कुठलातरी जुन्या जन्मातील राजा असावा,ह्य तर कुणी म्हटलेय, ह्यया बाळाने जन्माला येताच आयुष्यातील ताणतणाव पूर्णपणे बाय-बाय केलाय.ह्ण वैद्यकीय भाषेत बाळांच्या स्नायूंच्या हालचाली आणि लवचिकतेमुळे अशा वेगवेगळ्या पोजेस येऊ शकतात, पण या चिमुकल्याच्या निवांत आणि कूल अंदाजाने मात्र जगभरातील लोकांना हसवले आहे!
Read About : AI Cyber Attack India : भारतीय संस्थांवर AI सायबर हल्ल्यांचा धोका; CERT-In चा गंभीर इशारा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.