Ad Advertisement Ad Advertisement

Paithan Children Canal Incident – ‘पप्पा, आम्ही मरू…!’ 2 चिमुकल्यांची आर्त विनवणी; जन्मदात्या वडिलांवर गंभीर आरोप!

चॉकलेट अन् वडापावचं आमिष, स्कूटीवरून कालव्यापर्यंत प्रवास; पुढे जे घडलं ते हादरवणारं!

Paithan Children Canal Incident – दोन चिमुकल्यांना चॉकलेट आणि वडापाव खायला देण्याचं आमिष दाखवलं… स्कूटीवर बसवून फिरायला नेलं… पण पुढे जे घडलं, ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल! कारण ज्या वडिलांकडून मुलांना सुरक्षिततेची अपेक्षा होती, त्याच वडिलांनी आपल्या दोन पोटच्या मुलांना जायकवाडीच्या कालव्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही, तर मुलं जीव वाचवण्यासाठी विनवणी करत असतानाही वडिलांचं मन पाघळलं नाही!

ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या नांदर गावात घडली आहे…श्याम रोडगे, वय ५ वर्षे आणि आर्यन रोडगे, वय ७ वर्षे अशी या दोन्ही चिमुकल्यांची नावं आहेत. तर सोमनाथ दामोदर रोडगे, वय ४० वर्षे असं संशयित वडिलांचं नाव आहे..मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सोमनाथ रोडगे याने आपल्या दोन्ही मुलांना चॉकलेट आणि वडापाव खायला देण्याचं आमिष दाखवलं. त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने तो स्कूटीवर बसवून घराबाहेर पडला.
मात्र, मुलांना खाऊ खायला देण्याऐवजी तो त्यांना जायकवाडीच्या डाव्या कालव्याजवळ घेऊन गेला.

तिथे त्याने दोन्ही मुलांना कालव्यात फेकल्याचा आरोप आहे..यावेळी पाण्यात पडलेली ती दोन चिमुकली मुलं आपल्या वडिलांकडे जीवाची भीक मागत होती..दरम्यान, याचवेळी कालव्यावर पाणी सुरू करण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी सोमनाथला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने शेतकऱ्यांच्या दिशेने दगडफेक केली आणि शिवीगाळही केली…यानंतर नागरिकांनी तातडीने पाचोड पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली आणि सोमनाथ रोडगे याला ताब्यात घेतलं…सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली.

मात्र, चौकशीदरम्यान त्याने दोन्ही मुलांना कालव्यात फेकल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे…दुसरीकडे, सोमवारी रात्रीपासूनच पोलिस आणि नातेवाईकांकडून दोन्ही मुलांचा कालव्यात शोध घेतला जातोय. मात्र, पाण्याचा वेग आणि कालव्याच्या प्रवाहामुळे शोधकार्यात अडचणी येतायेत…मात्र, या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. एका वडिलांनीच आपल्या दोन चिमुकल्या मुलांसोबत असं केल्याचा आरोप असल्याने संपूर्ण पैठण तालुक्यात संताप व्यक्त केला जातोय…चॉकलेट आणि वडापावच्या आमिषाने वडिलांसोबत आनंदाने बाहेर पडलेल्या त्या दोन चिमुकल्यांचं पुढे काय झालं? हा प्रश्न आता संपूर्ण परिसराला पडला आहे.

‘पप्पा, आम्ही मरू… असं करू नका ना!’ अशी आर्त विनवणी

‘पप्पा, आम्ही मरू… असं करू नका ना!’ अशी आर्त विनवणी ते करत होते. पण समोर उभ्या असलेल्या जन्मदात्या वडिलांना त्यांची जराही दया आली नाही..मुलांचा जीव वाचवण्यासाठी काहीतरी करण्याऐवजी त्यांना कालव्यात फेकल्याचा हा प्रकार पाहून कोणाच्याही अंगाचा थरकाप उडेल!.

Read About : Cyber Fraud Using New Mothers’ Details – प्रसूत महिलांची माहिती सायबर भामट्यांच्या हाती !
E-Paper : Punyanagari E-Paperस्पेशल फीचर

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.