Ad Advertisement Ad Advertisement

Phulambri Farmers Suicide : फुलंब्री तालुक्यात 2 शेतकरी कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

काही तासांत दोन तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : Phulambri Farmers Suicide छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पिंप्री (सताळा) आणि पाल गावांत दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना समोर आल्या आहेत. गणेश कैलास पवार (वय २३) आणि अनिल अन्साराम जाधव (वय ३८) यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नापिकी, कमी पाऊस आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर या घटना घडल्या. गणेशने आत्महत्येपूर्वी व्हॉट्सॲप स्टेटस ठेवल्याचे सांगितले जात आहे, तर अनिल जाधव यांच्याजवळ सुसाईड नोट सापडल्याची माहिती आहे. त्यातील उल्लेख आणि घटनांमागील नेमकी कारणे यांचा पोलीस तपास करत आहेत.

यंदा भीषण दुष्काळ असल्यामुळे शैक्षणिक फीस कशी भरायची या विवंचनेत गणेश पवार अनेक दिसवांपासून तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. तर अनिल जाधव यंदा अत्यल्प पावसामुळे शेतीत अपेक्षित उत्पादन न झाल्याने ते आर्थिक अडचणीत होते.

Read About : Suicide Prevention : आत्महत्येचा प्रयत्न ७ दिवस आधीच ओळखणे शक्य
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.