Ad Advertisement Ad Advertisement

Preity Zinta – प्रीती झिंटाच्या ‘टीम तुकाराम मुंढे’ टी-शर्टचा जलवा

‘फक्त टी-शर्ट पुरेसे नव्हे, कृतीही महत्त्वाची’ – मुंढे

मुंबई: Preity Zinta – एक टी-शर्ट… त्यावर चार शब्द—’टीम तुकाराम मुंढे’ अभिनेत्री प्रीती झिंटाने हा टी-शर्ट घातल्याचा फोटो समोर आला आणि समाजमाध्यमांवर त्याची चर्चा सुरू झाली. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कामाला तिने दिलेल्या या पाठिंब्याची दखल खुद्द अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली. पण मुंढेचा प्रतिसाद फक्त ‘धन्यवाद’पुरता थांबला नाही. त्यांनी या निमित्ताने ‘पाठिंबा दाखवा, पण प्रत्यक्ष कामही करा’ असा स्पष्ट संदेश दिला.

मुंढे म्हणाले, ‘प्रीतीचे आभार!’

प्रीती झिंटाशी आपली वैयक्तिक भेट किंवा फोनवरून बोलणे झालेले नाही, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. मात्र तिने ‘टीम तुकाराम मुंढे’ असा उल्लेख केल्याबद्दल त्यांनी तिचे आभार मानले.
समाजातील चांगल्या हेतूचे लोक एकत्र आले आणि अन्नसुरक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयासाठी काम करू लागले, तर त्याचा फायदा सर्वांनाच होईल, असेही त्यांनी सांगितले.

‘टी-शर्ट घालणे सोपे, काम करणे महत्त्वाचे’

प्रीतीच्या टी-शर्टचा उल्लेख करताना मुंढे यांनी मुद्दा थेट मांडला. फक्त ‘टीम तुकाराम मुंढे’ लिहिलेला टी-शर्ट घातल्याने काम पूर्ण होत नाही. त्यामागे प्रत्यक्ष कृती आणि योग्य विचार असणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. म्हणजेच, पाठिंबा फक्त फोटो किंवा घोषणांपुरता नको, तो प्रत्यक्ष कामातून दिसला पाहिजे, हा त्यांचा संदेश होता.

प्रीतीच्या एका टी-शर्टने सुरू झाली नवी चर्चा

प्रीती झिंटाचा हा अंदाज समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरला. महाराष्ट्रातील अन्नसुरक्षेसाठी सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर तिचा हा पाठिंबा समोर आला. महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन अन्नपदार्थ, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित नियमांची अंमलबजावणी करते. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, हा मुद्दाही या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

टी-शर्टने लक्ष वेधले, पण.

..प्रीती झिंटाचा टी-शर्ट चर्चेत आला, पण तुकाराम मुंढेनी त्यातून एक साधा संदेश दिला, फक्त नावाच्या टीममध्ये असण्यापेक्षा, चांगल्या कामाच्या टीममध्ये प्रत्यक्ष सहभागी होणे महत्त्वाचे आहे.

Read About : Juhu Beach Cleanup After Ganpati Visarjan – 2026 गणपती गेले, पण कचऱ्याचे काय?
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.