नंदन पहाड परिसरातील घटनेने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू
देवघर : SBI ATM Theft झारखंडमधील देवघर शहरात चोरट्यांनी नंदन पहाड परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन गॅस कटरने कापून चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी मशीन कारमध्ये टाकून पळ काढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नंदन पहाड परिसरातील सेवा धामजवळ असलेल्या एसबीआयच्या एटीएम केंद्रात घडली. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास स्टेट बँकेच्या पाटणा येथील एटीएम नियंत्रण कार्यालयाला (कंट्रोल रूम) ही मशीन बंद झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नियंत्रण कक्षाने तात्काळ स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरट्यांनी आधी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून जमिनीपासून वेगळी केल्याचे दिसून आले. त्यानंतर ते मशीन सुमारे ५०० मीटर अंतरावरील एका जागी घेऊन गेले आणि तेथे उभ्या असलेल्या एका कारमध्ये मशीन घेऊन फरार झाले.
पोलिस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटवण्याचा आणि त्यांच्या पळून जाण्याच्या मार्गाचा शोध घेत आहेत. तसेच कारचा माग काढण्यासाठी परिसरातील इतर कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांकडेही काही संशयास्पद हालचाली दिसल्या का, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. चोरी झालेल्या एटीएममध्ये नेमकी किती रोकड होती, याची माहिती अजून समोर आलेली नाही; बँक प्रशासन या रकमेचा तपशील गोळा करत आहे.
Read About : Liquor Smuggling – गॅस सिलिंडरमध्ये दारूचा गुप्त कप्पा; बिहारमध्ये 127 बाटल्या जप्त
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.