दिल्लीतील ‘उत्सव’ कार्यक्रमात शालिनी पासींनी सांगितल्या बालपणीच्या आठवणी; ‘आजी-आजोबांसोबतची दिवाळी सर्वात सुंदर’
नवी दिल्ली : Shalini Passi Diwali Memories कला संग्राहक आणि रिअॅलिटी टीव्ही व्यक्तिमत्त्व शालिनी पासी यांनी बालपणीच्या दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला. दिल्लीमध्ये Myntraच्या ‘उत्सव’ या सणासुदीच्या फॅशन कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या शालिनी यांनी आजी-आजोबांसोबत साजरी केलेली दिवाळी आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणींपैकी एक असल्याचे सांगितले.
Metaच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला अभिनेत्री तृप्ती डिमरी यांच्यासह अनेक डिजिटल क्रिएटर्सनी उपस्थिती लावली होती. शालिनी पासी यांनी गुलाबी रंगाच्या आकर्षक पोशाखात कार्यक्रमात हजेरी लावत रेड कार्पेटवर लक्ष वेधून घेतले.
‘आजी-आजोबांसोबतची दिवाळी सर्वात सुंदर’
भारतीय सणांच्या आठवणींबद्दल बोलताना शालिनी पासी यांनी बालपणीच्या दिवसांची आठवण सांगितली. आजी-आजोबांसोबत साजरी केलेली दिवाळी त्यांच्या विशेष आठवणींमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
होळी आणि जन्माष्टमीच्या वेळीही त्या आजी-आजोबांसोबत मंदिरात जात असत. भारतीय संस्कृतीत लहानपणापासूनच सण, प्रार्थना आणि उत्सव यांचे महत्त्व मुलांना अनुभवायला मिळते आणि हीच बाब आपल्यासाठी विशेष असल्याचे शालिनी यांनी सांगितले.
‘Meta आणि Myntraचे सहकार्य गरजेचे’
Myntra आणि Metaच्या सहकार्याबद्दलही शालिनी पासी यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. डिजिटल माध्यमांनी बदललेल्या जगात अशा प्रकारचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांच्यामते, Metaने डिजिटल जगाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले असून या क्षेत्रात पुढे काय घडणार आहे, याबाबत उत्सुकता आहे.
‘सणासुदीला अधिक फुलं हवीत’
सणासुदीच्या काळातील कोणती गोष्ट अधिक चर्चेत यायला हवी, असे विचारले असता शालिनी पासी यांनी फुलांचा उल्लेख केला. सणांच्या सजावटीत आणि वातावरणात अधिक फुलांचा वापर व्हायला हवा, असे त्यांनी सांगितले.
पंजाबी कुटुंबातील सणांची खासियत
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या डिजिटल क्रिएटर्स कृतिका आणि दीक्षा खुराना यांनीही पंजाबी कुटुंबातील सणांच्या आठवणी सांगितल्या. स्वादिष्ट पदार्थ, घराची सजावट, दिव्यांची रोषणाई आणि कुटुंबातील सदस्यांचे एकत्र येणे यामुळे सणांचा आनंद द्विगुणित होत असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबातील सदस्यांमध्ये सणांच्या काळात छोट्या-मोठ्या कुरबुरी होत असल्या, तरी शेवटी सर्वजण एकत्र बसतात आणि तो क्षण विशेष असल्याचे त्यांनी नमूद केले.
दीक्षा खुराना यांनी आपल्या आवडत्या सणासुदीच्या पदार्थाबद्दल बोलताना आट्याचा हलवा विशेष आवडत असल्याचे सांगितले. हा हलवा त्यांची बहीण उत्तम बनवत असल्याचेही त्यांनी सांगितले. सणासुदीच्या काळात खाण्यापिण्याचा आनंद घेतल्यानंतर वाढलेल्या कॅलरींचा विचार करू, असे सांगत दीक्षा यांनी चाहत्यांना सणाचा मनमुराद आनंद घेण्याचा सल्ला दिला.
Read About : Jamie Lee Curtis – आईच्या 22 व्या स्मृतिदिनी जेनेट ले यांची आठवण
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.