सावंगी तलावाजवळ आत्महत्या : सिल्लोडचे रहिवासी, आठ महिन्यांपूर्वी आले होते शहरात
छत्रपती संभाजीनगर : Teacher Suicide :सॉरी, पत्नी आणि मुलीला जीव लावा.. कोणालाही त्रास देऊ नका, अशी सुसाईड नोट लिहून एका खासगी शाळेवरील शिक्षकाने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. हर्सूल परिसरातील जकात नाक्याजवळ सावंगी तलावाच्या परिसरात २० सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी हर्सूल ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सचिन रत्नाकर क्षीरसागर (४४, रा. सिल्लोड, ह.मु. टीव्ही सेंटर परिसर), असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते जाधववाडी भागातील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ते तेथे ज्ञानदानाचे काम करीत होते. दरम्यान, सावंगी तलाव परिसरात त्यांनी गळफास घेतल्याची माहिती हर्सूल पोलिसांना मिळाली. त्यावरून सहायक उपनिरीक्षक फरताडे आणि दोन होमगार्ड टू मोबाइलने तत्काळ घटनास्थळी गेले. तेथे पोलीस पोहोचल्यानंतर काही वेळातच मृताच्या खिशातील मोबाइलवर त्यांच्या चुलत भावाचा फोन आला. पोलिसांनी तो फोन उचलला आणि माहिती देत त्यांनाही घटनास्थळी बोलावले. त्यानंतर मृतदेह खाली घेऊन घाटीत पाठविला.
मुलीच्य शिक्षणासाठी आले होते शहरात
सचिन क्षीरसागर यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. ते गतवर्षीपर्यंत भोकरदन येथे खासगी शिकवणी चालवायचे. त्यांची मुलगी दहावी पास झाली असून तिच्या पुढील शिक्षणासाठी ते आठ महिन्यांपूर्वी संभाजीनगर शहरात आले होते. पण, त्यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत नेमकी माहिती समोर आली नाही.
Read About : Suicide Prevention : आत्महत्येचा प्रयत्न ७ दिवस आधीच ओळखणे शक्य
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.