मेधा शंकरसोबत लग्नाच्या अफवांवर कॉमेडियनचा विनोदी अंदाज; म्हणाला, “December मध्ये India Tour आहे”
मुंबई : Samay Raina Wedding Rumours : कॉमेडियन समे रैना आणि अभिनेत्री मेधा शंकर यांच्या लग्नाच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. डिसेंबर २०२६ मध्ये दोघे लग्न करणार असल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना उधाण आले. मात्र, समे रैनाने या चर्चांवर विनोदी अंदाजात प्रतिक्रिया देत अफवांना उत्तर दिले. समेने एका पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्यामध्ये, “समे रैना डिसेंबरमध्ये मेधा शंकरसोबत लग्न करणार?” असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. ही पोस्ट शेअर करत समेने लिहिले, “December मध्ये माझा India Tour आहे @medhashankr, sorry, will have to postpone.”
या पोस्टसोबत त्याने ‘झूठ बोले कौवा काटे’ हे गाणेही जोडले. त्यामुळे लग्नाच्या चर्चांवर त्याने मिश्कीलपणे टोला लगावल्याचे दिसून आले. यानंतर मेधा शंकरनेही समेची Instagram Story शेअर करत हसणाऱ्या इमोजींच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. तिने लग्नाच्या चर्चांवर आधारित एक मीमही शेअर केला. त्यासोबत तिने, “Me scrolling past all the baseless wedding rumours like” असे लिहिले.
‘India’s Got Latent’नंतर चर्चांना उधाण
- समे आणि मेधा यांच्या लग्नाच्या अफवा अभिनेत्रीच्या ‘India’s Got Latent’ च्या दुसऱ्या पर्वातील उपस्थितीनंतर अधिक चर्चेत आल्या. मेधा या कार्यक्रमात अभिनेता वरुण धवन आणि शॅरॉन वर्मा यांच्यासोबत सहभागी झाली होती. त्यांच्या एकत्र उपस्थितीमुळे सोशल मीडियावर दोघांबाबत विविध चर्चा सुरू झाल्या.
- मात्र, समे रैना किंवा मेधा शंकर यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही सार्वजनिक पुष्टी केलेली नाही. त्यामुळे सध्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडिया पोस्टपुरत्याच मर्यादित आहेत.
मेधा शंकरच्या कामाबद्दल
मेधा शंकरला २०२३ मधील ‘12th Fail’ या चित्रपटातील श्रद्धा जोशी यांच्या भूमिकेमुळे विशेष ओळख मिळाली. या चित्रपटात तिने विक्रांत मेसीसोबत काम केले होते. ती अलीकडेच ‘Ginnyy Wedss Sunny 2’ या चित्रपटात अविनाश तिवारीसोबत दिसली होती.
Read About : Salman Khan Trolling : ‘बस्स करा आता!’ – सलमान
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.