Ad Advertisement Ad Advertisement

Thane Pradeep Purnekar Murder – ठाणे हत्याकांडात धक्कादायक खुलासा; प्रदीप पूर्णेकर यांच्यावर 7 राऊंड फायर, धारदार शस्त्रानेही वार..

दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात..

ठाणे : Thane Pradeep Purnekar Murder : ठाण्यातील उद्धव ठाकरे शिवसेना विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडाबाबत एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे. एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्यावर २ नव्हे तर तब्बल ७ राऊंड फायर केले होते. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास मानपाडा – मनोरमा नगर येथील त्यांच्या कार्यालयात हा थरार घडला होता. प्राथमिक माहितीत २ राऊंड फायरचा उल्लेख होता, मात्र सीसी टीव्ही तील फुटेजनुसार आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी ७ गोळ्या झाडल्याचे तपासात पुढे येत आहे.

यातील २ गोळ्या पूर्णेकर यांच्या शरीरात छातीत लागल्या आणि त्या जीवघेण्या ठरल्या. ७ पैकी उरलेल्या गोळ्या कार्यालयाच्या भिंती आणि फर्निचरमध्ये आढळून आल्या आहेत.गोळीबारानंतरही हल्लेखोर थांबले नाहीत, त्यांनी धारदार शस्त्रानेही वार करून जागेवरून पळ काढला. त्यांना कापूरबावडी परिसरातील इन्फिनिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मानपाडा परिसरातील दुकाने बंद असून काल रात्रीपासून या परिसरात तणाव आहे. पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी ७ पथके कामाला लावली आहेत.

छातीत गोळ्या लागल्याने गंभीर जखमी

गोळीबारात पूर्णेकर यांच्या छातीला गोळ्या लागल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर त्यांना कापूरबावडी परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानेही वार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, अन्य संबंधितांचा शोध सुरू आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीचा आणि सर्व आरोपींच्या भूमिकेचा तपास केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे. हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याचाही तपास सुरू आहे.

परिसरात तणावाचे वातावरण

पूर्णेकर यांच्या हत्येनंतर मानपाडा-मनोरमानगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत. दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण आणि गोळीबारातील राऊंडची निश्चित संख्या तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Read About : Hyderabad Hotel Murder 2026 – हॉटेलमध्ये तरुणीचा मृत्यू; लिव्ह-इन पार्टनर ताब्यात
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.