सात जणांचा मृत्यू, १७ जखमी, तर वोल्गोग्राद तेल रिफाइनरीला आग
माॅस्को : Ukraine Drone Attack on Russia रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला असून, अमेरिकेच्या मध्यस्थीने शांतता चर्चा सुरू असतानाच युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला चढवला आहे. युक्रेनियन सैन्याने एकाच रात्रीत रशियावर तब्बल १,२०० ड्रोन डागले, ज्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात एका १२ वर्षांच्या मुलासह ७ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत, तर वोल्गोग्राद शहरातील तेल रिफाइनरीला भीषण आग लागली आहे. रशियाने १,१९८ ड्रोन हवेतच पाडल्याचा दावा केला आहे.
या महाहल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने युक्रेनवर ११७ ड्रोन डागले. झापोरिजिया येथील निवासी इमारतींवर झालेल्या हल्ल्यात २ जण दगावले व ३० जखमी झाले, तर ऊर्जा प्रकल्पांच्या नुकसानीमुळे युक्रेनचा अर्धा भाग अंधारात बुडाला आहे. दुसरीकडे, अबू धाबी येथे अमेरिका आणि युरोपीय देशांच्या सहभागाने शांतता चर्चा सुरू असली तरी, वाढत्या हल्ल्यांमुळे युरोपियन सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Read About : Microsoft Global Outage – तंत्रज्ञान जगतात खळबळ
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.