Ad Advertisement Ad Advertisement

Ukraine Kerch Bridge Attack – युक्रेनच्या हल्ल्यात केर्च पूलाचे मोठे नुकसान

रशियाने कीवमध्ये केलेल्या हल्ल्यांना तडाखेबंद प्रत्युत्तर

कीव : Ukraine Kerch Bridge Attack – युक्रेनने रात्री केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात रशियाला क्रीमियाशी जोडणाऱ्या व्युहात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या केर्च पूलाची मोठी हानी झाली आहे. रशियाने कीवमधील दिनप्रो नदीवरील पुलांसह इतर पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्यांना हे तडाखेबंद प्रत्युत्तर असल्याचे मानले जात आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ही कारवाई ‘अभूतपूर्व’ लष्करी मोहीम असल्याचे म्हटले आहे.
युक्रेनच्या ‘फ्लेमिंगो’ क्रुझ क्षेपणास्त्राने पूलाच्या रस्ता आणि रेल्वे मार्गाला लक्ष्य केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हल्ल्यामुळे केर्च पूलाचा २२७ मीटर लांबीचा रस्त्याचा कमान-भाग समद्रात कोसळला असून, पूलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

क्रीमिया ताब्यात घेतल्यानंतर बांधला होता पूल

२०१४ मध्ये रशियाने क्रीमियाला देशाच्या भुभागात विलीन केल्यानंतर बांधलेला हा पूल मॉस्कोच्या सत्तेचे प्रतीक मानला जातो. यापूर्वी २०२२ मध्ये ट्रक स्फोट आणि २०२३ मध्ये सागरी ड्रोनद्वारे युक्रेनने हा पूल पाडण्याचा प्रयत्न केला होता. आता रशियाचे हवाई संरक्षण धुळीस मिळवत युक्रेनने अत्याधुनिक ड्रोन आणि बॅस्टिक क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हा मोठा प्रहार केला आहे.

रशियन सैन्याला रसद मार्ग बदलावे लागणार

पूल पूर्णपणे क्षतिग्रस्त झाल्यामुळे रशियन सैन्याला आता क्रीमियाकडे जाणारे पुरवठा मार्ग बदलावे लागणार आहेत. रशियाने हा पूल लवकरच पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले असले, तरी युक्रेनच्या सततच्या हल्ल्यांमुळे दुरुस्तीचे काम अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे. दरम्यान, अमेरिकेचे प्रतिनिधी आणि युरोपीय नेत्यांसोबत युद्ध संपवण्याच्या शक्यतेवर वाटाघाटी सुरू असतानाच हा हल्ला झाल्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

Read About : Ukraine Drone Attack on Russia – रशियावर युक्रेनचा आतापर्यंतचा सर्वात भीषण ड्रोन हल्ला; एकाच रात्रीत डागले 1200 ड्रोन E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.