शंकरपूरमधील शतकभर जुने चैती माता मंदिर नदीत वाहून गेले
गलपूर : बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात गंगेच्या वाढत्या पाणीपातळीमुळे शंकरपूर गावातील शतकभर जुने मंदिर नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मंदिरात श्रद्धास्थान असलेले चैती माता दुर्गा मंदिर होते.
गंगेच्या पाण्याचा प्रवाह वाढत गेल्याने मंदिराचा पाया कमकुवत झाला आणि अखेर संपूर्ण मंदिर नदीच्या पात्रात कोसळले. मंदिर नदीत वाहून जात असल्याचे दृश्य पाहून स्थानिक नागरिकांना मोठा धक्का बसला.
या मंदिराला परिसरातील गावांमध्ये मोठे धार्मिक महत्त्व होते. चैती माता दुर्गेच्या दर्शनासाठी आसपासच्या अनेक गावांमधून दरवर्षी हजारो भाविक येथे येत असल्याचे सांगण्यात येते. मंदिर नदीच्या प्रवाहात कोसळताना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक घटनास्थळी जमले होते.
गंगेच्या वाढत्या पाणीपातळीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.