Ad Advertisement Ad Advertisement

67th Convocation Ceremony – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 4 नोव्हेंबरला दीक्षांत सभारंभ

आयसीटीचे कुलगुरू प्रा.अनिरुध्द पंडित हे प्रमुख पाहुणे

छत्रपती संभाजीनगर : 67th Convocation Ceremony – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६७ वा दीक्षांत सभारंभ ४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६७ वा दीक्षांत सभारंभ आता येत्या ४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. राज्य विद्यापीठांचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आयसीटीचे कुलगुरू प्रा.अनिरुध्द पंडित यांना प्रमुख पाहुणे निमंत्रित करण्यात आले आहे. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठ नाटयगृहात हा सोहळा संपन्न होणार आहे.

यंदाच्या दीक्षांत सोहळयास मुंबई येथील राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्था इन्स्टट्यिूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रा. अनिरुध्द पंडित दीक्षांत भाषण देणार आहेत. तर राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन होईल. यावेळी कुलगुरु डॉ.विजय फुलारी हे स्वागतपर व प्रास्ताविक भाषण करतील. प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. संजय कवडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. बी. एन. डोळे, चारही विद्या शाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती राहील.

Read About : Surgical Skills Training – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शस्त्रक्रिया कौशल्यांचे प्रशिक्षण
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.