एका नवीन निरीक्षकासह दोन एपीआयची नियुक्ती : सध्याचे एपीआय नीलेश शेळके यांची बदली
छत्रपती संभाजीनगर : Bidkin Police Station जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात डीएमआयसीने ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. बिडकीन डीएमआयसीत कंपन्यांचा विस्तार वाढू लागताच उद्योजकांच्या सुरक्षेची हमी घेत पोलीस अधीक्षकांनी बिडकीन पोलीस ठाण्याचेही बळ वाढविले आहे. आतापर्यंत सहायक पोलीस निरीक्षक या ठाण्याचा कारभार सांभाळत होते. मात्र, पोलीस अधीक्षकांनी आता येथे एका निरीक्षकासह दोन सहायक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे कामातील सुटसुटीतपणा आणि औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे.
बिडकीनचे सध्याचे सहायक निरीक्षक नीलेश शेळके यांचा कार्यकार पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तडवी यांची ठाणेदार म्हणून नियुक्ती केली असून योगेश धोंडे आणि विनोद वाघ या दोन सहायक पोलीस निरीक्षकांचीही बिडकीन ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ एक सहायक निरीक्षक असलेल्या बिडकीन ठाण्यात यापुढे एक निरीक्षक आणि दोन सहायक निरीक्षकांसह उपनिरीक्षक कार्यरत असतील.
बिडकीन डीएमआयसीतील ऑरिक स्मार्ट सिटीच्या औद्योगिक विस्ताराने वेग धरला आहे. येथे जवळपास ९ कंपन्यांची प्रत्यक्ष स्थापना सुरू आहे. त्यात मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचीही समावेश आहे. काही कंपन्यांनी तर थेट उत्पादनही सुरु केले आहे. या भागात औद्योगिक विकासासोबतच रिअल इस्टेटनेही चांगला वेग पकडला आहे. त्यामुळे ठाण्यातील तक्रारींचेही प्रमाण प्रचंड वाढले आहे. प्रत्येक तक्रारदाराला न्याय देता यावा, कायदा व सुव्यवस्था राखता यावी, यादृष्टीने पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी हे नियोजन केले आहे.
नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना नियुक्ती
- नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक राजू तडवी हे आता बिडकीनचे नवे ठाणेदार असतील.
- सहायक निरीक्षक योगेश धोंडे यांचीही बिडकीन ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
- सहायक निरीक्षक विनोद वाघ यांनाही बिडकीन ठाण्यात नियुक्ती देण्यात आली.
- पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे यांची सोयगाव ठाण्यात बदली करण्यात आली.
- उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे यांची सिल्लोड शहर ठाण्यातून पिशोर ठाण्यात बदली केली आहे.
Read About : Pregnant Woman Suicide – सहा महिन्यांच्या गर्भवतीची गच्चीवरून उडी मारून आत्महत्या
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.