Ad Advertisement Ad Advertisement

Titan Submersible Implosion : ‘टायटॅनिक’ च्या सहलीला गेलेली ‘टायटन’ पाणबुडी कशी बुडाली?

टायटॅनिकच्या अवशेषांना पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा समुद्राच्या खोल भागात विनाशकारी स्फोट कसा झाला, जाणून घ्या संपूर्ण घटना

Titan Submersible Implosion न्यूयॉर्क : १८ जून २०२३ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास टायटन (Titan) पाणबुडीचा दरवाजा घट्ट बंद करण्यात आला आणि हळूहळू अटलांटिक महासागरात खाली उतरवण्यात आली. ‘ओशनगेट’ कंपनीच्या या २२ फूट लांबीच्या पानबुडीत पाच प्रवासी होते. पाणबुडीच्या एका छोट्या खिडकीतून समुद्राच्या तळाशी गेलेल्या टायटॅनिक (Titanic) या ऐतिहासिक जहाजाचे दर्शन ते घेणार होते.

१४ एप्रिल १९१२ रोजी १२,५०० फूट खाली समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक (Titanic) या प्रवासी जहाजाची (क्रूज) झलक पाहण्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर पाणबुडी अचानक बेपत्ता झाली. पाणबुडीत ९६ तास पुरेल इकाच ऑक्सिजन होता. इतक्या खोलवर समुद्राच्या प्रचंड दबावामुळे स्फोट झाला आणि ती बुडाली, अशी कारणमीमांसा नंतर करण्यात आली. जहाजावरील सर्वजण मिलिसेकंदातच मृत्युमुखी पडले. टायटॅनिक (Titanic) जहाजाच्या अवशेषांपासून १६०० फूट खाली टायटन (Titan) पाणबुडीचे अवशेष सापडले.

तत्पूर्वी ओशनगेटच्या कर्मचाऱ्यांनी बेपत्ता पाणबुडीशी संपर्क पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न केला. सकाळी ११.१५ वाजता ओशनगेट टीमच्या सदस्यांनी ज्या जहाजावरून ही पाणबुडी समुद्रात सोडण्यात आली त्या पोलार प्रिन्स या जहाजाचे कॅप्टन डेव्हिड फर्ग्युसन यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या समस्येची माहिती दिली. दुपारी ३.२० वाजताच्या बैठकीत ठरले की जर टायटन संध्याकाळी ६.३५ पर्यंत पृष्ठभागावर परत आली नाही तर ते तटरक्षक दलाशी संपर्क साधतील. परंतु तसे न झाल्याने बचाव मोहीम सुरू करण्यात आली.

ही वेळेविरुद्धच्या शर्यतीची सुरुवात होती. ९६ तासांच्या ऑक्सिजन पुरवठ्यासह समुद्राच्या तळाशी अडकलेले पाच धाडसी शोधकांना परत आणण्याची.

पाणबुड्या, नौदल आणि अगदी लष्करी विमानातून सोडलेल्या ‘सोनार बोय’ यांचा समावेश करून एक मोठी शोध मोहीम सुरू करण्यात आली.
दुसऱ्या दिवसाच्या शोधादरम्यान समुद्राच्या खोलवर ३० मिनिटांच्या अंतराने काही आवाज टिपण्यात आले. त्याने तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले आणि आशा निर्माण केली की हा आवाज जहाजावरील पाच जणांनी दिलेले संदेश असू शकतात.

२२ जून रोजी दूरस्थपणे नियंत्रित केले जाणारे एक यंत्र ‘ओडिसियस ६’ टायटनचे (Titan) अवशेषांना धडकेपर्यंत ही शोधमोहीम होती. परंतु नंतर मात्र सगळे संपल्याचे स्पष्ट झाले. आपत्ती स्थळावरील फुटेजमध्ये २०० मीटरपेक्षा जास्त परिघात पसरलेले पाणबुडीचे अवशेष दिसले.

Titan Submersible Implosion या अब्जाधीशांचा मृत्यू

या अपघातात ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश, ब्रिटिश अब्जाधीश हामिश हार्डिंग आणि पाकिस्तानी अब्जाधीश शहजादा दाऊद, त्यांचा मुलगा सुलेमान, फ्रेंच साहसवीर पॉल हेन्री यांचा मृत्यू झाला.

Read About : Michel Peiry : सीरियल किलर – मिशेल पेरी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.